मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Bisleri-Tata deal : मुलीला बिझनेसमध्ये इंट्रेस्ट नाही म्हणून वडिलांनी ‘बिसलेरी’ कंपनी विकायला काढली

Bisleri-Tata deal : मुलीला बिझनेसमध्ये इंट्रेस्ट नाही म्हणून वडिलांनी ‘बिसलेरी’ कंपनी विकायला काढली

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Nov 24, 2022 03:07 PM IST

Ramesh chauhan on bisleri: बिसलेरीचे अध्यक्ष रमेश चौहान यांनी पॅक्ड वाॅटरचा व्यवसायाच्या खरेदीदारांच्या शोधात आहेत. यासाठी टाटा कन्झ्युमर प्राॅडक्ट लिमिटेडसहित अनेक कंपन्यांशी चर्चा सुरु आहे.

Bisleri HT
Bisleri HT

Ramesh chauhan on bisleri: देशातील सर्वात मोठी पॅक्ड वाॅटर मेकर बिसलेरी आपला व्यवसाय विक्री करत आहे. कंपनी खरेदीदारांच्या शोधात असून टाटा समुह यासाठी प्रमुख दावेदार मानले जात आहेत. बिसलेरी इंटरनॅशनलचे अध्यक्ष रमेश चौहान हे आता ८२ वर्षांचे आहेत. त्यांना व्यवसाय विक्रीचे कारण विचारले असता त्यांनी दिलेले उत्तर हे आश्चर्यकारक होते. ते म्हणाले, बिसलेरीचा व्यवसाय पुढे जाऊन कोणालातरी सांभाळावा लागणार आहे, त्यासाठी आम्ही योग्य पर्यायाच्या शोधात आहोत. कारण माझी मुलगी जयंतीला हा व्यवसाय सांभाळण्यात इंट्रेस्ट नाही.

कराराच्या ७००० कोटी मूल्यावर बोलण्यास नकार

टाटा आणि बिसलेरी यांच्यातील ७००० कोटी मूल्यांसंदर्भातही रमेश चौहान यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी याबाबत त्यांनी फार बोलण्यास नकार दिला. दरम्यान व्यवसाय विक्रीच्या निर्णयावर त्यांनी होकार दिला. यासाठी आम्ही संभावित खरेदीदारांच्या शोधात आहोत. टाटा कन्झ्युमरसोबत होत असलेल्या करारासंदर्भातही कंपनीच्या प्रवक्त्यांनी फार बोलण्यास नकार दिला.

साॅफ्ट ड्रिंकचा व्यवसाय कोका कोलाला विकला

चौहान यांनी तीस वर्षांपूर्वी आपल्या साॅफ्ट ड्रिकच्या व्यवसाय कोकाकोला या अमेरिकास्थित कंपनीला विकला होता. त्यांनी थम्प्स अप, गोल्ड स्पाॅट, माजा आणि लिम्का सारखे ब्रँड्स १९९३ मध्ये कंपनीला विकले होते. ते २०१६ मध्ये पुन्हा साॅफ्ट ड्रिक व्यवसायात उतरले. पण त्यांच्या बिसलेरी पाॅप या उत्पादनाला फारशी बाजारपेठ मिळाली नाही.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग