मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Tata group IPO : तब्बल १८ वर्षांनंतर येतोय टाटाच्या कंपनीचा आयपीओ, गुंतवणुकीची संधी

Tata group IPO : तब्बल १८ वर्षांनंतर येतोय टाटाच्या कंपनीचा आयपीओ, गुंतवणुकीची संधी

Nov 17, 2022, 12:34 PM IST

  • Tata Group IPO :  तब्बल १८ वर्षानंतर टाटा समुहातील एका कंपनीचा आयपीओ येत आहे. तुम्ही शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही नामी संधी ठरु शकते.

tata motors HT

Tata Group IPO : तब्बल १८ वर्षानंतर टाटा समुहातील एका कंपनीचा आयपीओ येत आहे. तुम्ही शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही नामी संधी ठरु शकते.

  • Tata Group IPO :  तब्बल १८ वर्षानंतर टाटा समुहातील एका कंपनीचा आयपीओ येत आहे. तुम्ही शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही नामी संधी ठरु शकते.

Tata Tech IPO : ; तब्बल १८ वर्षानंतर टाटा समुहातील एका कंपनीचा आयपीओ येत आहे. तुम्ही शेअर्समध्ये गुंतवणूक कऱण्याचा विचार करत असाल तर ही नामी संधी ठरु शकते. वास्तविक १८ वर्षांपूर्वी २००४ मध्ये टाटा कन्सल्टन्सीचा आयपीओ (टीसीएस) बाजारात दाखल झाला होता. त्यानंतर आता २०२२ मध्ये टाटा समुहाने टाटा टेक कंपनीचा आयपीओ आणण्याची तयारी सुरु केली आहे. टाटा टेक ही टाटा मोटर्सची सब्सिडिअरी कंपनी आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Redmi 13 C 5G: शाओमीचा 5G स्मार्टफोन झाला स्वस्त, १० हजारांत मिळतोय दमदार कॅमेरा

Investors kyc : केवायसी पूर्ण न केल्यानं सव्वा कोटी गुंतवणूकदारांची खाती ठप्प, तुमचं खातं तर यात नाही ना?

LPG Gas cylinder price : निवडणूक सुरू असतानाच व्यावसायिक गॅस सिलिंडर झाला स्वस्त; तुमच्या शहरात दर किती?

Sriniva pallia : विप्रोचे नवे सीईओ श्रीनिवास पल्लिया यांचं सॅलरी पॅकेज किती? पगाराबरोबर आणखी काय-काय मिळणार?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टाटा समुहातील या कंपनीचा आयपीओ आर्थिक वर्ष २०२४ च्या पहिल्या तिमाहीत येण्याची योजना आहे. येत्या तिमाहीत कंपनी सेबीकडे आयपीओसाठी दस्तावेज सादर करेल. सध्या कंपनी इश्यूसाठी मर्चंट बॅकर्सशी बातचीत केली जात आहे. कंपनी आयपीओच्या माध्यमातून आँफर फाॅर सेल आणि फ्रेश शेअर्स दोन्ही जारी करु शकते. टाटा मोटर्सची टाटा टेक्नाॅलाॅजीमध्ये अंदाजे ७२.४८ टक्के हिस्सा आहे. तर सिंगापूरमधील गुंतवणूक कंपनी अल्फा टीसीकडे टाटा टेकमधील अंदाजे ८.९६ टक्के हिस्सा आहे.

टाटा टेकचा भर हा प्रामुख्याने आँटोमोटिव्ह, एअरोस्पेस, औद्योगिक उत्पादने आणि उद्योग क्षेत्रावर आहे. याचे मुख्य केंद्र पुण्यात आहे. याशिवाय जगभरात १८ ठिकाणी वितरक केंद्रे असून ९३ हजार कर्मचारी काम करतात.

विभाग