मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Tata motors car Price hike : टाटा मोटर्सच्या ‘या’ गाड्या होणार महाग, ७ नोव्हेंबरपासून दरवाढ लागू

Tata motors car Price hike : टाटा मोटर्सच्या ‘या’ गाड्या होणार महाग, ७ नोव्हेंबरपासून दरवाढ लागू

Nov 05, 2022, 03:08 PM IST

    • टाटा मोटर्सच्या गाड्या खरेदी करणे आता अधिक महाग होणार आहे. कारण कंपनीने प्रवासी वाहनांच्या किंमतीत ०.९० टक्के वाढ केली आहे. या वाढीव किंमती ७ नोव्हेंबरपासून लागू होणार आहेत. 
tata motors cars HT

टाटा मोटर्सच्या गाड्या खरेदी करणे आता अधिक महाग होणार आहे. कारण कंपनीने प्रवासी वाहनांच्या किंमतीत ०.९० टक्के वाढ केली आहे. या वाढीव किंमती ७ नोव्हेंबरपासून लागू होणार आहेत.

    • टाटा मोटर्सच्या गाड्या खरेदी करणे आता अधिक महाग होणार आहे. कारण कंपनीने प्रवासी वाहनांच्या किंमतीत ०.९० टक्के वाढ केली आहे. या वाढीव किंमती ७ नोव्हेंबरपासून लागू होणार आहेत. 

टाटा मोटर्सच्या कार खरेदी करणे आता महाग होणार आहे. कंपनीने यासंदर्भात जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार,  टाटा मोटर्स प्रवासी वाहनांच्या किमती ०.९०% ने वाढवणार आहे. या वाढलेल्या किमती ७ नोव्हेंबरपासून लागू होतील. टाटाच्या पॅसेंजर व्हेईकल सेगमेंटमध्ये सफारी, हॅरियर, अल्ट्रोझ, नेक्सॉन, टियागो आणि टिगोर या कार आहेत. टाटा मोटर्सने आपल्या वाहनांच्या किमती वाढवण्याची या वर्षातील ही चौथी वेळ आहे.

ट्रेंडिंग न्यूज

YouTuber बनायचे आहे? यशस्वी युट्यूबर बनण्यासाठी काय करावे?

adani group stock : अदानीच्या 'या' पावरफुल शेअरनं रचला नवा विक्रम; अवघ्या १५ महिन्यांत तब्बल ३६३ टक्के वाढ

Upcoming Smartphones: कमी किंमतीत जबरदस्त फीचर्स; मे महिन्यात बाजारात धुमाकूळ घालायला येत आहेत 'हे' ५ स्मार्टफोन!

Buddha Purnima bank holiday: बुद्ध पौर्णिमेला बँका बंद आहेत का? पाहा राज्यनिहाय यादी

व्हेरिएंट आणि मॉडेलनुसार किंमत वाढ

टाटा मोटर्सच्या मते, त्यांच्या प्रवासी वाहनांच्या किमती किती वाढतील, हे प्रकार आणि मॉडेलनुसार ठरवले जाणार आहे.  याचाच अर्थ  सर्व वाहनांच्या किमती स्वतंत्रपणे वाढतील.

जुलैमध्येही दर वाढले होते

टाटा मोटर्सने यापूर्वी जुलैमध्ये किमती वाढवल्या होत्या. प्रवासी वाहनांच्या किमती ०.५५% ने वाढल्या आहेत. यापूर्वी एप्रिलमध्येही किमती सुमारे १.१% वाढल्या होत्या. इतकेच नाही तर यापूर्वी जानेवारी २०२२ मध्ये कंपनीने विविध मॉडेल्स आणि प्रकारांच्या आधारे ०.९% ने वाढ केली होती. उत्पादन खर्चात वाढ झाल्याने किंमत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे कंपनीने जाहीर केले होते.  

ऑक्टोबरमध्ये वाहन विक्री १५.४९% वाढली

ऑक्टोबर २०२२ मध्ये टाटा मोटर्सची एकूण विक्री ७८, ३३५ युनिट्सवर होती, जी वार्षिक तुलनेत १५.४९ % जास्त होती. गेल्या वर्षी याच कालावधीत कंपनीने ६७२८९ वाहनांची विक्री केली होती. ऑक्टोबरमध्ये, टाटा मोटर्सच्या एकूण देशांतर्गत विक्रीत वार्षिक १७% वाढ होऊन ७६,५३७ युनिट्स झाली. जी ऑक्टोबर २०२१ मध्ये ६५,१५२ युनिट होती.

ऑक्टोबर २०२२ मध्ये, टाटा मोटर्सने देशांतर्गत बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहनांसह एकूण ४५,४२३ प्रवासी वाहने विकली. तर ऑक्टोबर २०२१ मध्ये कंपनीने देशांतर्गत बाजारात एकूण ३४,१५५ प्रवासी वाहने विकली.rutu

विभाग

पुढील बातम्या