मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Tata Successor plan : हे ठरणार टाटा समुहाचे उत्तराधिकारी, रतन टाटा देणार ट्रेनिंग

Tata Successor plan : हे ठरणार टाटा समुहाचे उत्तराधिकारी, रतन टाटा देणार ट्रेनिंग

Nov 03, 2022, 12:33 PM IST

    • टाटा ट्रस्टशी संलग्न असलेल्या टाटा मेडिकल सेंटर ट्रस्टमध्ये नोएल टाटा यांची मुले लेआ, नेव्हिल आणि माया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रतन टाटा यांच्या देखरेखीखाली त्यांना मोठ्या भूमिकेसाठी तयार करण्याचा ट्रस्टचा निर्णय आहे.
Tata group HT

टाटा ट्रस्टशी संलग्न असलेल्या टाटा मेडिकल सेंटर ट्रस्टमध्ये नोएल टाटा यांची मुले लेआ, नेव्हिल आणि माया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रतन टाटा यांच्या देखरेखीखाली त्यांना मोठ्या भूमिकेसाठी तयार करण्याचा ट्रस्टचा निर्णय आहे.

    • टाटा ट्रस्टशी संलग्न असलेल्या टाटा मेडिकल सेंटर ट्रस्टमध्ये नोएल टाटा यांची मुले लेआ, नेव्हिल आणि माया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रतन टाटा यांच्या देखरेखीखाली त्यांना मोठ्या भूमिकेसाठी तयार करण्याचा ट्रस्टचा निर्णय आहे.

Tata Suceessor Plan : टाटा ट्रस्टशी संलग्न असलेल्या टाटा मेडिकल सेंटर ट्रस्टमध्ये नोएल टाटा यांची मुले लेआ, नेव्हिल आणि माया यांची नियुक्ती करण्यात आली. या प्रकरणाशी परिचित असलेल्या एका व्यक्तीने हे पाऊल टाटा समूहाच्या नेतृत्वासाठी पुढच्या पिढीला तयार करणारे असल्याचे म्हटले आहे. नाव न सांगू इच्छिणाऱ्या या व्यक्तिने सांगितले की, टाटा मेडिकल सेंटरच्या बोर्डावर या तिघांचा समावेश करण्याचा टाटा ट्रस्टच्या निर्णयामुळे त्यांना अध्यक्ष रतन टाटा यांच्या देखरेखीखाली मोठ्या भूमिकेसाठी तयार होण्यास मदत होईल.

ट्रेंडिंग न्यूज

Investors kyc : केवायसी पूर्ण न केल्यानं सव्वा कोटी गुंतवणूकदारांची खाती ठप्प, तुमचं खातं तर यात नाही ना?

LPG Gas cylinder price : निवडणूक सुरू असतानाच व्यावसायिक गॅस सिलिंडर झाला स्वस्त; तुमच्या शहरात दर किती?

Sriniva pallia : विप्रोचे नवे सीईओ श्रीनिवास पल्लिया यांचं सॅलरी पॅकेज किती? पगाराबरोबर आणखी काय-काय मिळणार?

Ola layoffs : 'ओला' करणार १० टक्के कर्मचारी कपात! सीईओ हेमंत बक्षी यांनी दिला राजीनामा

ट्रस्टची संख्या दुप्पट 

या तिघांच्या नियुक्तीमुळे टाटा मेडिकल सेंटर ट्रस्टमधील विश्वस्तांची संख्या दुप्पट झाली आहे. बोर्डावर रतन टाटा, विजय सिंग आणि मेहली मिस्त्री आधीच आहेत. या तिन्ही मुलांना टाटा ट्रस्टच्या एका छोट्या ट्रस्टमध्ये सामावून घेऊन त्यांना पुढे नेण्याची तयारी सुरू आहे.

ट्रस्टमध्ये नियुक्तीचा फायदा

टाटा मेडिकल सेंटर २०११ मध्ये सुरू झाले आणि ४३१ बेडचे हॉस्पिटल चालवते. सध्या लिआ, माया आणि नेव्हिल मधल्या फळीतील व्यवस्थापनाच्या भूमिकेत आहेत.  पुढे जाण्यापूर्वी खालच्या पातळीपासून सुरुवात करावी, असे कुटुंबाचे मत आहे.

टाटा समूह परिचय

- स्टॉक एक्सचेंजमध्ये २९ कंपन्या सूचीबद्ध

- १०० हून अधिक सहायक युनिट्स

- ९.३५ लाख कर्मचारी

-  एकत्रित बाजार भांडवल ३११ अब्ज अमेरिकन डाॅलर 

- टाटा समूहात जवळपास ६० बिगर अनलिस्टेड कंपन्या आहेत, ज्यापैकी एअर इंडिया, विस्तारा सारख्या कंपन्यांनी अद्याप शेअर बाजारात प्रवेश केलेला नाही.

डिजिटलची जबाबदारी

माया टाटा डिजिटलमध्ये काम करत आहे. डिजिटल क्षेत्रात टाटा समूहाचा प्रमुख उपक्रम आहे. टाटा डिजिटल अनेक महत्त्वाकांक्षी योजनांवर काम करत आहे.

इंडियन हॉटेलपासून सुरुवात

नोएल टाटाची मोठी मुलगी लीहने माद्रिदमधील आयई बिझनेस स्कूलमध्ये मार्केटिंगचे शिक्षण घेतले आहे. भारतीय हॉटेल्स कंपनीच्या वाढ आणि विस्तारामध्ये ती सहभागी झाली आहे.

किरकोळ क्षेत्रातही ठसा

नेव्हिल सध्या त्याचे वडील नोएल टाटा चालवत असलेल्या ट्रेंट लिमिटेडशी संबंधित आहेत. ट्रेंट वेस्टसाइड आणि क्रोमा सारखी किरकोळ दुकाने चालवते.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

विभाग