मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Maruti Swift : SUV खरेदीसाठी मारुति स्विफ्ट बेस्ट आॅप्शन, कंपनी देतेय इतक्या हजारांची बंपर सवलत

Maruti Swift : SUV खरेदीसाठी मारुति स्विफ्ट बेस्ट आॅप्शन, कंपनी देतेय इतक्या हजारांची बंपर सवलत

Apr 16, 2023, 03:50 PM IST

    • Maruti Swift : एसयूव्ही सेगमेंटमधील मारुति सुझुकी स्विफ्ट खरेदी करायची असेल तर आत्ताच्या आत्ता शोरुममध्ये जा. कारण कंपनीने ३० एप्रिलपर्यंत या गाडीच्या खरेदीवर जबरदस्त सवलत दिली आहे.
maruti suzuki swift HT

Maruti Swift : एसयूव्ही सेगमेंटमधील मारुति सुझुकी स्विफ्ट खरेदी करायची असेल तर आत्ताच्या आत्ता शोरुममध्ये जा. कारण कंपनीने ३० एप्रिलपर्यंत या गाडीच्या खरेदीवर जबरदस्त सवलत दिली आहे.

    • Maruti Swift : एसयूव्ही सेगमेंटमधील मारुति सुझुकी स्विफ्ट खरेदी करायची असेल तर आत्ताच्या आत्ता शोरुममध्ये जा. कारण कंपनीने ३० एप्रिलपर्यंत या गाडीच्या खरेदीवर जबरदस्त सवलत दिली आहे.

Maruti Swift : देशातील सर्वात मोठी वाहन कंपनी मारुति सुझुकीने आपल्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या स्विफ्ट कारवर पुढील १५ दिवसांसाठी ६५००० रु.ची सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. जर तुम्हाला कार खरेदी करायची असेल तर एप्रिल महिन्यात स्विफ्टवर ६५००० रु,पर्यंत सूट मिळू शकते. मारुती सुझुकी इंडियाची ही ऑफर ३० एप्रिलपर्यंत वैध आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Investors kyc : केवायसी पूर्ण न केल्यानं सव्वा कोटी गुंतवणूकदारांची खाती ठप्प, तुमचं खातं तर यात नाही ना?

LPG Gas cylinder price : निवडणूक सुरू असतानाच व्यावसायिक गॅस सिलिंडर झाला स्वस्त; तुमच्या शहरात दर किती?

Sriniva pallia : विप्रोचे नवे सीईओ श्रीनिवास पल्लिया यांचं सॅलरी पॅकेज किती? पगाराबरोबर आणखी काय-काय मिळणार?

Ola layoffs : 'ओला' करणार १० टक्के कर्मचारी कपात! सीईओ हेमंत बक्षी यांनी दिला राजीनामा

जर तुम्हाला मारुती सुझुकीची स्विफ्ट खरेदी करायची असेल तर तुम्ही पुढील १५ दिवस या ऑफरचा लाभ घेऊ शकतात. मारुती सुझुकीची स्विफ्ट ही मार्च महिन्यात सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली आहे.

मारुती सुझुकी स्विफ्टच्या एलएक्सआय आणि एएमटी प्रकारांना ४५००० रुपयांपर्यंत सवलत मिळत आहे. यामध्ये १० हजारांची रोख सवलत, १५ हजारांची कॉर्पोरेट सूट आणि २० हजारांचे एक्सचेंज बोनस समाविष्ट आहे. मारुती स्विफ्टच्या सीएनजी प्रकारावर १० हजारांची रोख सूट मिळत आहे.

स्विफ्टच्या इतर व्हेरियंटमध्ये ३० हजारांची रोख सूट, १५ हजारांची कॉर्पोरेट सूट आणि २० हजारांचा एक्सचेंज बोनस मिळत आहे. अशा प्रकारे, तुम्ही मारुती सुझुकीची स्विफ्ट खरेदी करून एप्रिल महिन्यात ६५ हजारांचा लाभ घेऊ शकतात.

मारुती स्विफ्टची किंमत ५.९९ लाखांपासून सुरू होते आणि ९.०३ लाख (एक्स-शोरूम) पर्यंत जाते. मारुती सुझुकी स्विफ्ट चार प्रकारात एलएक्सआय, व्हीएक्सआय, झेडएक्सआय आणि झेडएक्सआय प्लसमध्ये उपलब्ध आहे. स्विफ्ट ही ५ सीटर कार असल्याने त्यात पाच जण बसू शकतात.

विभाग