मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Maruti Suzuki Baleno : SUV मध्ये मारुती सुझुकी बलेनो ठरली नंबर बन कार, सात लाखांपेक्षा कमी किंमत

Maruti Suzuki Baleno : SUV मध्ये मारुती सुझुकी बलेनो ठरली नंबर बन कार, सात लाखांपेक्षा कमी किंमत

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Mar 13, 2023 05:55 PM IST

Maruti Suzuki Baleno : बलेनोच्या विक्रीत दरवर्षीच ४८ टक्के सकारात्मक वाढ दिसून आली. मारुती सुझुकी स्विफ्टची विक्री फेब्रुवारीत २०२२ मध्ये १९,२०२ युनिट्सच्या तुलनेत १८,४१२ युनिट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आली, यात ४ टक्क्यांची घट दिसून आली.

Maruti Suzuki Baleno HT
Maruti Suzuki Baleno HT

Maruti Suzuki Baleno : बलेनोच्या विक्रीत दरवर्षीच ४८ टक्के सकारात्मक वाढ दिसून आली. मारुती सुझुकी स्विफ्टची विक्री फेब्रुवारीत २०२२ मध्ये १९,२०२ युनिट्सच्या तुलनेत १८,४१२ युनिट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आली, यात ४ टक्क्यांची घट दिसून आली.

मारुती सुझुकीने नुकतेच नवी एसयूव्ही आणि प्रिमियम माॅडेल लाॅन्च करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. मात्र विक्रीतील मोठा हिस्सा हा कंपनीच्या एन्ट्री लेव्हलच्या गाडीतून मिळतो. बलेनो ही देशात सर्वाधिक विक्री झालेली पॅसेंजर गाडी होती. या गाडीच्या १८, ५९२ यूनिट्सची विक्री मागच्या महिन्यात झाली. गेल्या वर्षी याच कालावधीत अंदाजे १२ हजार ५७० गाड्यांची विक्री झाली होती.

वार्षिक आधारावर बलेनो कारच्या विक्रीत ४८ टक्क्यांची सकारात्मक वाढ झाली आहे. मारुती सुझुकी स्विफ्ट फेब्रुवारी २०२२ मध्ये १९,२०२ युनिट्सच्या तुलनेत १८,४१२ युनिट्ससह दुसऱ्या क्रमांकावर होती. त्यात चार टक्क्यांची घट झाली. एंट्री-लेव्हल हॅचबॅकच्या ११,५५१ युनिट्सच्या तुलनेत अल्टोने १८,११४ युनिट्सची विक्री केली.

या गाड्यांच्या विक्रीतही वाढ

वार्षिक आधारावर वाहन विक्रीत ५७ टक्के वाढ नोंदवण्यात आली. बलेनो, स्विफ्ट, अल्टोने गेल्या महिन्यात ५५ हजारांपेक्षा अधिक यूनिट्सची विक्री केली आहे. वॅगनारने फेब्रुवारी २०२२ मध्ये १४,६६९० यूनिट्सच्या विक्रीत १५ टक्के वाढ झाली. ह्युंदाई ग्रॅड आय १० एनआयओएस पाचव्या स्थानी आहे.

आयटेन आणि आॅरा

आय टेन एनआयओएस आणि आॅरा काही आठवड्यांपूर्वी भारतात फेसलिफ्ट करण्यात आले होते. आयटेनने गेल्या महिन्यात ९,६३५ युनिट्स विकले. २०२२ मध्ये याच कालावधीत विकल्या गेलेल्या ८,५५२ युनिट्सच्या तुलनेत १३ टक्के वाढ झाली. दुसऱ्या सहामाहीत, ह्युंदाई आय २० फेब्रुवारी २०२२ मध्ये ५,८३० युनिट्सच्या तुलनेत ९,२८७ युनिट्ससह सहाव्या स्थानावर आहे. त्यात ५९ टक्के वाढ झाली आहे. टाटा टियागो मारुती सुझुकी इग्निस, सेलेरियो आणि टोयोटा ग्लान्झा यांच्या मागे सातव्या स्थानावर आहे.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग