मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Do you know : भाड्याने घर खरेदी करतायेत तर या गोष्टी लक्षात ठेवा, कधीच अडचण येणार नाही

Do you know : भाड्याने घर खरेदी करतायेत तर या गोष्टी लक्षात ठेवा, कधीच अडचण येणार नाही

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Apr 16, 2023 01:02 PM IST

Home Rent Rules & Rights : जेव्हा तुम्ही भाड्याने घर घेता तेव्हा तुमच्यासाठी भाडे करार तयार केला जातो, जो खूप महत्त्वाचा असतो. हा एक दस्ताऐवज आहे,, यात घरमालक आणि भाडेकरू दोघांमध्ये करार केला जातो. यामध्ये दोन्ही पक्षांशी संबंधित प्रत्येक प्रकारची माहिती देण्यात येते.

home rent and rules HT
home rent and rules HT

Home Rent Rules & Rights : आजकाल सर्व लोक कामासाठी घरापासून दूर राहतात. आणि तुम्ही राहता त्या शहरांमध्ये स्वतःचे घर घेणे थोडे कठीण होते. त्यामुळे लोक भाड्याने घरे घेऊन राहतात. त्यामुळे ही बातमी तुमच्या उपयोगाची आहे.

जेव्हा तुम्ही भाड्याने घर घेता तेव्हा तुमच्यासाठी भाडे करार तयार केला जातो, जो खूप महत्त्वाचा असतो. हे एक दस्तावेज असून घरमालक आणि भाडेकरु यांच्यात तयार केले जाते. यामध्ये दोन्ही पक्षांशी संबंधित प्रत्येक प्रकारची माहिती देण्यात येते. या दोघांनीही कागदपत्रात नमूद केलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

भाडेकरू म्हणून तुमच्याकडे अनेक अधिकार आहेत. त्यांचा वापर तुम्ही गरज पडल्यास करू शकता. जर तुम्हाला या अधिकारांची जाणीव असेल तर तुम्हाला अनेक समस्या टाळता येऊ शकतात. त्यामुळेच तुम्हाला अॅग्रीमेंट आणि इंडियन रेंट रेग्युलेशनशी संबंधित काही गोष्टींबद्दल माहिती असणे गरजेचे आहे.

भाडेकरूचे अधिकार काय आहेत?

जर तुम्ही भाड्याने घर घेत असाल, तर घरमालकाने तुम्हाला काही सुविधा देणे अनिवार्य आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त सुरक्षितता आणि गोपनीयतेचा अधिकार यासारख्या गोष्टींचा समावेश आहे. कोणताही घरमालक कोणत्याही वैध कारणाशिवाय भाडेकरूला घरातून बाहेर काढू शकत नाही. भाड्याने घर घेताना तुम्ही तुमच्या घरमालकाशी लेखी करार करावा. जेणेकरुन कोणत्याही प्रकारच्या वादाची तक्रार करता येईल.

भारतीय भाडे नियमनाचे नियम काय आहेत?

भारतात मोठ्या प्रमाणात घरे लोकांनी भाड्याने दिली आहेत. केंद्र सरकारच्या मॉडेल टेनन्सी कायद्यानुसार भाडेकरूने भाडे करारावर स्वाक्षरी करणे अत्यंत आवश्यक आहे. भारतात भाड्याच्या घरांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने मॉडेल टेनन्सी कायदा लागू केला आहे. याद्वारे ही प्रक्रिया भाडेकरू आणि घरमालक दोघांसाठीही फायदेशीर व्हावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

अडचण टाळण्यासाठी ही बाब गरजेची

भाड्याने घरे घेणारे बरेच लोक भाडेपत्र बनवणे आणि त्याची नोंदणी करणे याला फारसे महत्त्व देत नाहीत. अनेक वेळा, काही पैसे वाचवण्यासाठी भाडेकरू आणि घरमालक दोघेही नोंदणी करून तडजोड करतात. काहीवेळा, भाडेपत्र करूनही ते शुल्क टाळण्यासाठी नोंदणी करून घेत नाहीत. जर तुम्ही असे काही केले तर ते तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते तसेच त्याकडे बेकायदेशीर कृती म्हणून पाहिले जाते. अशा परिस्थितीत वाद झाला तर ते दोन्ही पक्षांसाठी अडचणीचे ठरू शकते.

WhatsApp channel

विभाग