मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Rupay Credit Card: आता बेधडक वापरा रूपे क्रेडिट कार्ड; २ हजारपर्यंतच्या व्यवहारांवर शुल्क माफ

Rupay Credit Card: आता बेधडक वापरा रूपे क्रेडिट कार्ड; २ हजारपर्यंतच्या व्यवहारांवर शुल्क माफ

Oct 05, 2022, 06:20 PM IST

  • Rupay Credit Card: युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (यूपीआय ) द्वारे रूपे क्रेडिट कार्डवरून २ हजार रुपयांपर्यंतच्या व्यवहारांसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

Rupey Credit card HT

Rupay Credit Card: युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (यूपीआय ) द्वारे रूपे क्रेडिट कार्डवरून २ हजार रुपयांपर्यंतच्या व्यवहारांसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

  • Rupay Credit Card: युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (यूपीआय ) द्वारे रूपे क्रेडिट कार्डवरून २ हजार रुपयांपर्यंतच्या व्यवहारांसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

Rupay Credit Card: युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (यूपीआय ) द्वारे रूपे क्रेडिट कार्डवरून २ हजार रुपयांपर्यंतच्या व्यवहारांसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एन पी सी आय)नुकत्याच काढलेल्या परिपत्रकात रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार ही सवलतरूपे क्रेडिट कार्ड धारकांना देण्यात आल्याचे म्हटले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Redmi 13 C 5G: शाओमीचा 5G स्मार्टफोन झाला स्वस्त, १० हजारांत मिळतोय दमदार कॅमेरा

Investors kyc : केवायसी पूर्ण न केल्यानं सव्वा कोटी गुंतवणूकदारांची खाती ठप्प, तुमचं खातं तर यात नाही ना?

LPG Gas cylinder price : निवडणूक सुरू असतानाच व्यावसायिक गॅस सिलिंडर झाला स्वस्त; तुमच्या शहरात दर किती?

Sriniva pallia : विप्रोचे नवे सीईओ श्रीनिवास पल्लिया यांचं सॅलरी पॅकेज किती? पगाराबरोबर आणखी काय-काय मिळणार?

शून्य मर्चंट डिस्काउंट रेट (एमडीआर ) २ हजार रुपयांपर्यंतच्या व्यवहारासाठी लागू असेल,असे एन पीसीआयने स्पष्ट केले . एमडीआर म्हणजे क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारे ग्राहकांकडून पेमेंट स्वीकारण्यासाठी व्यापारी बँकेला जी रक्कम भरतो ती रक्कम. एमडीआर व्यवहाराच्या रकमेच्या आधारावर आकारला जातो.

रूपे हे एनपीसीआयने आणलेले देशीप्लास्टिक कार्ड आहे. देशातील पेमेंट सिस्टीम एकत्रित करणे हा त्याचा उद्देश आहे. देशातील सर्व प्रमुख बँका रूपेडेबिट कार्ड जारी करतात. हे इतर कार्ड्स (युरो पे,मास्टरकार्ड,व्हिसा) सारखेच आहे. सर्व भारतीय बँका,एटीएम,पीओएस टर्मिनल किंवा ई-कॉमर्स वेबसाइटवरहे कार्ड सहजतेने वापरता येते.

रूपे कार्ड्सद्वारे जे व्यवहार केले जातात,त्याचा खर्च कमी असूनप्रक्रियाही वेगवान आहे.कारण देशातच ही प्रक्रिया केली जाते . सध्या भारतात १२३६ बँका रूपे कार्ड जारी करतात.

ग्लोबल फिन्टेक फेस्टिव्हलमध्ये गेल्या महिन्यात म्हणजेच २१ सप्टेंबर रोजी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी युपीआय नेटवर्कवर रुपे क्रेडिट कार्ड लाँच केले. यापूर्वी,केवळ डेबिट कार्ड आणि खाती युपीआय नेटवर्कशी जोडली जाऊ शकत होती. सध्या पंजाब नॅशनल बँक,युनियन बँक ऑफ इंडिया आणि इंडियन बँक या तीन बँकांनी ही सुविधा दिली आहे.

विभाग