मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Share Tips : ‘या’ ७ आयटी कंपन्या देतील चांगली साथ, तज्ज्ञांचे BUY रेटिंग

Share Tips : ‘या’ ७ आयटी कंपन्या देतील चांगली साथ, तज्ज्ञांचे BUY रेटिंग

Oct 05, 2022, 06:28 PM IST

  • निफ्टी आयटी इंडेक्समध्ये यंदाच्या वर्षी 31 टक्क्यांपर्यंतची घसरण पहायला मिळाली. त्याच्या तुलनेत निफ्टीमध्ये २.५ टक्के घट झाली. या घसरणीचा फायदा आता गुंतवणूदारांना होणार आहे. 

These seven IT stocks should buy : Expert

निफ्टी आयटी इंडेक्समध्ये यंदाच्या वर्षी 31 टक्क्यांपर्यंतची घसरण पहायला मिळाली. त्याच्या तुलनेत निफ्टीमध्ये २.५ टक्के घट झाली. या घसरणीचा फायदा आता गुंतवणूदारांना होणार आहे.

  • निफ्टी आयटी इंडेक्समध्ये यंदाच्या वर्षी 31 टक्क्यांपर्यंतची घसरण पहायला मिळाली. त्याच्या तुलनेत निफ्टीमध्ये २.५ टक्के घट झाली. या घसरणीचा फायदा आता गुंतवणूदारांना होणार आहे. 

शेअर बाजारासाठी चालू वर्ष हे मोठ्या चढ उतारांचं राहिलय. त्यामुळे अनेक मोठ्या कंपन्यांवर सट्टा लावणाऱ्या गुंतवणूकदारांनाही मोठा फटका बसला आहे. या वर्षी ज्या क्षेत्राने गुंतवणूकदारांची निराशा केली त्यात आयटी क्षेत्राचा समावेश आहे. निफ्टीच्या आयटी निर्देशांकात यंदा ३१ टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे. त्याच वेळी निफ्टी या तुलनेत केवळ 2.5 टक्क्यांनी घसरला आहे. या घसरणीच्या काळात गुंतवणूकदारांसाठीही मोठी संधी आहे.

ट्रेंडिंग न्यूज

TCS CEO Salary : भारतातील सर्वात मोठी IT कंपनी TCS च्या सीईओचा दर महिन्याचा पगार माहितीय का? वाचून व्हाल थक्क!

Business Ideas : उद्योग क्षेत्रात ‘जो दिखता है वोही बिकता है...’ हेच सूत्र चालतं…

Akshaya Tritiya Investment : फक्त सोनेच नाही, अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ही गुंतवणूकही ठरते शुभ

Bank News : 'या' बँकेत तुमचं खातं असेल, पण बँक बॅलन्स नसेल तर एक महिन्यानंतर खातं थेट बंद होणार

कोणते आहेत हे स्टाॅक्स 

विविध ब्रोकरेज फर्मच्या सर्वेक्षणानुसार, आगामी काळात टीसीएसचे शेअर्सचे मूल्य ४२०० रु जाण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. याशिवाय इन्फोसिससाठी १९३० रु., कोफोर्जसाठी ५०१० रु, पर्सिसंटसाठी ४४२० रु. आणि एमफासिससाठी टार्गेट मूल्य ३०८० दिले आहे. 

ब्रोकरेज फर्मच्या मते, जगभरातील अनिश्चित काळाने आयटी क्षेत्राला मोठा धक्का दिला आहे. यामुळेच शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली. परंतु मंदीच्या वेळी हे आयटीए समभाग दीर्घ मुदतीत चांगला परतावा देऊ शकतात. येत्या काही दिवसांत आयटी क्षेत्राचा महसूल 2.2 टक्क्यांवरून 7.1 टक्क्यांपर्यंत वाढेल अशी ब्रोकरेजची अपेक्षा आहे.

 

(डिस्‍क्‍लेमर: ही माहिती केवळ कंपन्यांच्या शेअर मार्केटमधील कामगिरीवर आधारीत आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. त्यामुळं वाचकांनी आपल्या वित्तीय सल्लागाराच्या सुचनेनुसारच गुंतवणुकीचा निर्णय घ्यावा.)

पुढील बातम्या