मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Astrology : घरातून बाहेर पडताना कोणता पाय आधी बाहेर ठेवाल?, उजवा की डावा?

Astrology : घरातून बाहेर पडताना कोणता पाय आधी बाहेर ठेवाल?, उजवा की डावा?

Mar 18, 2023, 08:11 AM IST

  • Which Foot To Keep First Out Of The House : घरातून बाहेर पडताना आपण नेहमी कोणता पाय आधी घराबाहेर ठेवायचा याबाबत अनेक वाद असलेले पाहातो. आज मात्र शास्त्र काय सांगतं घराबाहेर जाताना किंवा घरात येताना कोणता पाय आधी आत किंवा बाहेर टाकावा, याची माहिती घेणार आहोत.

घराबाहेर जाताना कोणता पाय आधी बाहेर ठेवावा (हिंदुस्तान टाइम्स)

Which Foot To Keep First Out Of The House : घरातून बाहेर पडताना आपण नेहमी कोणता पाय आधी घराबाहेर ठेवायचा याबाबत अनेक वाद असलेले पाहातो. आज मात्र शास्त्र काय सांगतं घराबाहेर जाताना किंवा घरात येताना कोणता पाय आधी आत किंवा बाहेर टाकावा, याची माहिती घेणार आहोत.

  • Which Foot To Keep First Out Of The House : घरातून बाहेर पडताना आपण नेहमी कोणता पाय आधी घराबाहेर ठेवायचा याबाबत अनेक वाद असलेले पाहातो. आज मात्र शास्त्र काय सांगतं घराबाहेर जाताना किंवा घरात येताना कोणता पाय आधी आत किंवा बाहेर टाकावा, याची माहिती घेणार आहोत.

घरातून बाहेर पडताना आपण नेहमी कोणता पाय आधी घराबाहेर ठेवायचा याबाबत अनेक वाद असलेले पाहातो. आज मात्र शास्त्र काय सांगतं घराबाहेर जाताना किंवा घरात येताना कोणता पाय आधी आत किंवा बाहेर टाकावा, याची माहिती घेणार आहोत.

संबंधित फोटो

Rashi Bhavishya Today : प्रदोष व्रताचा आजचा दिवस कसा जाईल! वाचा राशीभविष्य

May 05, 2024 04:00 AM

Guru Shukra Yuti : वृषभ राशीत होणार गुरू-शुक्र युती, आता या ५ राशींची पूर्ण होणार सर्व स्वप्ने

May 04, 2024 03:45 PM

Panchak 2024: सुरू आहे पंचक काळ! चुकूनही 'या' वेळेत करू नका शुभ कामं! जाणून घ्या अशुभ वेळ

May 04, 2024 01:50 PM

Rashi Bhavishya Today : वरुथिनी एकादशीचा आजचा दिवस कसा जाईल! वाचा राशीभविष्य

May 04, 2024 04:27 AM

Rashi Bhavishya Today : विषयोगात शुक्रवारचा आजचा दिवस किती महत्वाचा राहील! वाचा राशीभविष्य

May 03, 2024 04:00 AM

Rashi Bhavishya Today : गजकेसरी योगात आजचा दिवस कोणासाठी ठरेल खास! वाचा राशीभविष्य

May 02, 2024 04:00 AM

याचं महत्वाचं कारण म्हणजे घरातून बाहेर पडताना चुकीचा पाय आधी बाहेर ठेवला तर नुकसान होऊ शकतं. जर तुम्हीही काही महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर जात असाल तर आधी कोणता पाय बाहेर ठेवायचा हे जाणून घ्या. जेणेकरून शुभ फळ मिळू शकेल.

घराबाहेर जाताना आधी कोणता पाय बाहेर ठेवावा

घराबाहेर जाताना उजवा पाय आधी बाहेर ठेवल्याने यश मिळते. बहुतेकदा तुम्ही घरातील वडीलधाऱ्यांचे म्हणणे ऐकले असेल की, घराबाहेर पडताना उजवा पाय आधी बाहेर ठेवा. सामुद्रिक शास्त्रात असेही मानले जाते की, जर तुम्ही कोणत्याही शुभ कार्यासाठी घराबाहेर जात असाल तर सर्वप्रथम उजवा पाय घराबाहेर टाकावा. असे केल्याने सर्व कामे चांगल्या प्रकारे पूर्ण होतात आणि कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागत नाही.

घरात प्रवेश करताना कोणता पाय आधी आत घ्यावा

घरात प्रवेश करताना उजवा पाय आधी घरात घेणं शुभ मानलं जातं. समुद्री शास्त्रानुसार घरात लग्न होते तेव्हा वधू घरात प्रवेश करताना आधी उजवा पाय घरात ठेवते. वास्तविक, ही फार जुनी परंपरा आहे की कोणत्याही शुभ कार्यासाठी निघण्यापूर्वी उजवा पाय प्रथम घराबाहेर ठेवावा. असे केल्याने, तुम्ही ठरवलेल्या कोणत्याही कामात तुम्हाला नक्कीच यश मिळते.

यामागचं दुसरं एक शास्त्र असं आहे की, उजवा हात आणि डावा हात यातही पूजा करताना उजव्या हाताचा वापर केला जातो. त्याप्रमाणे, घराबाहेर जातानाही उजवा पाय घराबाहेर ठेवणं हे शुभ मानलं गेलं आहे तर, डावा पाय घराबाहेर ठेवणे याला शास्त्रात नकारात्मकतेचं लक्षण मानलं गेलं आहे.

(या लेखात दिलेली माहिती, पूर्णपणे खरी आणि अचूक आहे असा आमचा दावा नाही आणि त्यांचा अवलंब केल्यास अपेक्षित परिणाम मिळेल असाही आम्ही दावा करत नाही)

विभाग