मराठी बातम्या  /  क्रीडा  /  T20 World Cup 2022: रोहितनंतर टीम इंडियाचा कॅप्टन कोण? ३ दिग्गजांनी घेतलं एकच नाव

T20 World Cup 2022: रोहितनंतर टीम इंडियाचा कॅप्टन कोण? ३ दिग्गजांनी घेतलं एकच नाव

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Oct 25, 2022 07:42 PM IST

Wasim Akram and Waqar Younis on Hardik Pandya: पाकिस्तानी दिग्गज वसीम अक्रम आणि वकार युनूस यांनी हार्दिक पांड्याचे तोंडभरुन कौतुक केले आहे. हार्दिक भविष्या टीम इंडियाचा कर्णधार होईल, असे भाकित दोघांनीही केले आहे.

T20 World Cup 2022
T20 World Cup 2022

भारतीय क्रिकेट संघाने T20 विश्वचषकात पाकिस्तानचा ४ गडी राखून पराभव करून स्पर्धेची धमाकेदार सुरुवात केली. या सामन्यात भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने नाबाद ८२ धावांची खेळी केली. पाकिस्तानविरुद्धच्या या विजयात केवळ विराटच नाही तर हार्दिक पांड्या, अर्शदीप सिंग आणि भुवनेश्वर कुमार यांचाही मोलाचा वाटा होता. हार्दिकने चेंडूसह फलंदाजीतही अप्रतिम कामगिरी केली. त्याने ४० धावांची खेळी खेळून कोहलीसोबत शतकी भागीदारी तर केली. शिवाय त्यापूर्वी गोलंदाजीतही ३ विकेट्स घेतल्या.

ट्रेंडिंग न्यूज

मेलबर्नमधील विजयात विराट कोहलीचा सर्वात मोठा वाटा राहिला. त्यामुळे त्याची सर्वत्र चर्चा होत आहे. मात्र, असे असले तरी पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू वसीम अक्रम आणि वकार युनूस यांना हार्दिक पांड्याने चांगलेच प्रभावित केले आहे. या दोघांनी पांड्या हा भविष्यातील भारताचा कर्णधार असेल, असे भाकित केले आहे.

पाकिस्तानच्या एका टीव्ही चॅनलवरील चर्चेदरम्यान हे सर्व दिग्गज बोलत होते. यावेळी माजी कर्णधार मिसबाह-उल-हक म्हणाला की, 'जर तुम्ही हार्दिक पांड्याकडे बघितले तर कदाचित त्याने प्रथमच आयपीएलमध्ये कर्णधारपद भूषवले आहे आणि ज्या पद्धतीने त्याने संघाला हाताळले ते कौतुकास्पद होते. याशिवाय तो संघात फिनिशरच्या भूमिकेतही दिसला आणि तुम्ही मानसिकदृष्ट्या मजबूत असाल तरच तुम्ही संघात फिनिशर होऊ शकता".

त्यानंतर या चर्चेदरम्यान वकार युनूस म्हणाला, 'हार्दिक टीम इंडियाचा पुढचा कर्णधार झाल्यास मला अजिबात आश्चर्य वाटणार नाही.'

यानंतर वसीम अक्रमनेही हार्दिकबाबत आपले मत मांडले. तो म्हणाला की, 'हार्दिक पहिल्या आयपीएलमध्ये कर्णधार झाला, त्यात त्याने स्पर्धा जिंकली. सध्या तो भारतीय संघाची प्रमुख शक्ती आहे. तो कॅप्टनलादेखील सल्ला देतो. तो आपला शब्द शांतपणे आपले म्हणणे मांडतो. यासोबतच तो वेगाने शिकत आहे".

WhatsApp channel

संबंधित बातम्या