मराठी बातम्या  /  Sports  /  T20 World Cup 2022 Haris Rauf And Shaheen Afridi Meets Virat Kohli In Perth Photo Viral

Virat Kohli: मेलबर्नमधील धुलाईनंतर शाहीन-हरिस विराटच्या भेटीला, भेटीत काय घडलं? पाहा

Haris Rauf And Shaheen Afridi Meets Virat Kohli
Haris Rauf And Shaheen Afridi Meets Virat Kohli
Rohit Bibhishan Jetnavare • HT Marathi
Oct 30, 2022 10:50 AM IST

Haris Rauf And Shaheen Afridi Meets Virat Kohli: भारत आणि पाकिस्तानचे संघ पर्थमध्ये आहेत. यादरम्यान विराट कोहली काही पाकिस्तानी खेळाडूंना भेटला आहे, ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

T20 World Cup 2022: T20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ दोन सामन्यांत दोन विजयांसह गट-२ मध्ये अव्वल स्थानावर आहे. सुपर-१२ मधील भारताचा तिसरा सामना आज रविवारी (३० ऑक्टोबर) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. दोन्ही संघ पर्थमध्ये आमनेसामने येणार आहेत. कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघही रविवारी याच मैदानावर आपला सामना खेळणार आहे. पाकिस्तानला नेदरलँड्सच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. या सामन्यासाठी भारत आणि पाकिस्तानचे संघ पर्थमध्ये आहेत. यादरम्यान विराट कोहली काही पाकिस्तानी खेळाडूंना भेटला आहे, या भेटीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

भेटीत काय घडलं?

सुपर-१२ मधील भारताच्या पहिल्या सामन्यात विराट कोहलीने पाकिस्तानविरुद्ध संस्मरणीय खेळी खेळली होती. त्याने पाकिस्तानच्या सर्व गोलंदाजांना चांगलाच चोप दिला होता. दरम्यान, पाकिस्तानचे वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी आणि हरिस रौफ यांनी पर्थमध्ये विराटची भेट घेतली. यावेळी तिघांमध्ये काही वेळ चर्चा झाली. खेळाडूंमध्ये हास्याचे आणि विनोदाचे वातावरण दिसले. मात्र, या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे कळू शकलेले नाही.

कोहलीने मेलबर्नमध्ये पाकिस्तानविरुद्ध नाबाद ८२ धावांची खेळी केली होती. हरिस रौफच्या १९व्या षटकात त्याने मारलेले दोन षटकार क्रिकेट चाहते कधीच विसरणार नाहीत. षटकाच्या पाचव्या चेंडूवर कोहलीने स्ट्रेटला षटकार ठोकला. त्याचवेळी सहाव्या चेंडूवर त्याने फाइन लेगवर फ्लिक करत षटकार मारला. या दोन षटकारांनी सामना भारताच्या दिशेने फिरला. टीम इंडियाला शेवटच्या षटकात १६ धावा करायच्या होत्या. मोहम्मद नवाजच्या शेवटच्या चेंडूवर अश्विनने विजयी धाव घेतली.

पाकिस्तान वर्ल्डकपमधून बाहेर पडण्याच्या मार्गावर

भारताविरुद्धचा सामना हरल्यानंतर पाकिस्तानचा संघ झिम्बाब्वेकडूनही पराभूत झाला. दुसऱ्या सामन्यात त्यांचा एका धावेने पराभव झाला. सलग दोन पराभवानंतर पाकिस्तानचा संघ स्पर्धेतून बाद होण्याच्या मार्गावर आहे. उपांत्य फेरी गाठण्यासाठी त्यांना उर्वरित तीन सामने जिंकावे लागतील. नेदरलँडनंतर त्यांचा सामना दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशशी होणार आहे. तिन्ही सामने जिंकण्याबरोबरच पाकिस्तानला इतर संघांच्या कामगिरीवरही लक्ष ठेवावे लागणार आहे.

WhatsApp channel

संबंधित बातम्या