Glenn Phillips: दिमाग के उपर एक्स्ट्रा दिमाग! मंकडिंगपासून बचावासाठी फिलिप्सची भन्नाट आयडिया
मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Glenn Phillips: दिमाग के उपर एक्स्ट्रा दिमाग! मंकडिंगपासून बचावासाठी फिलिप्सची भन्नाट आयडिया

Glenn Phillips: दिमाग के उपर एक्स्ट्रा दिमाग! मंकडिंगपासून बचावासाठी फिलिप्सची भन्नाट आयडिया

Oct 29, 2022 06:40 PM IST

Glenn Phillips Mankding Idea VIDEO: श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात आज (२९ऑक्टोबर) न्युझीलंडच्या ग्लेन फिलिप्सने शानदार शतकी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. सोबतच त्याने मांकडिंग रन आऊटपासून स्वता:चा बचाव कसा करायचा हेदेखील शिकवले आहे. न्यूझीलंड-श्रीलंका सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर खेळला गेला.

Glenn Phillips Mankding Idea
Glenn Phillips Mankding Idea

T20 World Cup New Zealand Vs Sri Lanka highlights: ICC T20 विश्वचषकात न्यूझीलंडने ग्रुप-१ मधील सामन्यात श्रीलंकेचा ६५ धावांनी धुव्वा उडवला. न्युझीलंडचा ग्लेन फिलिप्स या विजयाचा हिरो ठरला. टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या न्युझीलंडची अवस्था एकवेळ १५ धावांवर ३ गडी बाद अशी होती. त्यानंतर ग्लेन फिलिप्सने शतक झळकावत अशा विकेटवर फलंदाजी कशी करायची ते दाखवून दिले. एवढेच नाही तर ग्लेन फिलिप्सने जगभरातील फलंदाजांना मांकडिंग रनआउटपासून बचाव कसा करायचा हेदेखील शिकवले आहे.

जगभरातील फलंदाजांनी फिलिप्सकडून ही आयडिया घेतली पाहिजे. धावण्याच्या शर्यतीत धावपटू जसा गार्ड घेतात, अगदी तशाच शैलीत फिलिप्स नॉन स्ट्रायकर एंडला उभा असलेला दिसला. गोंलदाजाने चेंडू रीलीज करताच तो धावायला सुरुवात करायचा.

ग्लेन फिलिप्सच्या या भन्नाट आयडियाचे जगभरातून कौतुक होत आहे. गेल्या काही काळापासून मंकडिंगची बरीच चर्चा होत आहे. १ ऑक्टोबर २०२२ पासून, ICC ने क्रिकेटच्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत, यामध्ये Mankading ला रनआउटच्या श्रेणीत टाकण्यात आले आहे. पूर्वी ते Unfair Play च्या श्रेणीत होते.

ग्लेन फिलीप्स सामनावीर

न्यूझीलंडने १५ धावांत ३ विकेट गमावल्या होत्या. फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे आणि केन विल्यमसन हे स्वस्तात तंबूत परतले. त्यानंतर ग्लेन फिलिप्सने डॅरेल मिशेलच्या साथीने डाव सावरला. फिलिप्स आणि डॅरिल मिशेल यांनी चौथ्या विकेटसाठी ८४ धावांची भागीदारी रचली. त्यानंतर न्युझीलंडने दमदार पुनरागमन केले. या पुनरागमनात ग्लेन फिलिप्सचा सर्वात मोठा वाटा राहिला. फिलिप्सने प्रथम थोडी सावध फलंदाजी केली, नंतर तुफानी फटके खेळत संघाची धावसंख्या पुढे नेण्यास सुरुवात केली. फिलिप्सने ६४ चेंडूत १० चौकार आणि ४ षटकारांसह १०४ धावा केल्या. या बळावरच न्यूझीलंडने २० षटकांत ७ बाद १६७ धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ १९.२ षटकांत १०२ धावांत गारद झाला. ग्लेन फिलिप्सला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.

Whats_app_banner