Dhanashree & Chahal: चाहत्यांनी मर्यादा ओलांडली! धनश्रीच्या फोटोवर युझीबद्दल वाईट कमेंट्स
मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Dhanashree & Chahal: चाहत्यांनी मर्यादा ओलांडली! धनश्रीच्या फोटोवर युझीबद्दल वाईट कमेंट्स

Dhanashree & Chahal: चाहत्यांनी मर्यादा ओलांडली! धनश्रीच्या फोटोवर युझीबद्दल वाईट कमेंट्स

Oct 29, 2022 01:00 PM IST

Yuzvendra Chahal and Dhanashree Verma: धनश्री वर्माने तिच्या इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे, जो सिडनीच्या मेनली बीचचा आहे. या फोटोमध्ये ती सुंदर पोज देताना दिसत आहे. चाहते मात्र, या पोस्टवरुन तिची आणि युझीची खिल्ली उडवत आहेत. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चाहते त्यावर वाईट कमेंट करत आहेत.

Yuzvendra Chahal and Dhanashree Verma
Yuzvendra Chahal and Dhanashree Verma

T20 विश्वचषकात टीम इंडियाने आतापर्यंत दोन सामने खेळले आहेत. या दोन्ही सामन्यात संघाने विजय मिळवला. मात्र, टीम इंडियाचा लेग-स्पिनर युझवेंद्र चहलला या दोन्ही सामन्यांमध्ये भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नाही. मात्र, अशातच आता युझी चहल एका विशेष कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. युझीसोबत त्याची पत्नी धनश्री वर्माही सोशल मीडियावर सध्या चर्चेत आली आहे. धनश्रीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टवरुन ती आणि युझी जोरदार ट्रोल होत आहेत.

युझी चहलसोबत धनश्रीदेखील सध्या ऑस्ट्रेलियात आहे. धनश्रीने तिच्या इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे, जो सिडनीच्या मेनली बीचचा आहे. या फोटोमध्ये ती सुंदर पोज देताना दिसत आहे. चाहते मात्र, या पोस्टवरुन तिची आणि युझीची खिल्ली उडवत आहेत. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चाहते त्यावर मजेशीर कमेंट करत आहेत.

अशा कमेंट करताना चाहत्यांनी आपली मर्यादा ओलांडल्याचे पाहायला मिळाले. चाहत्यांनी युझीच्या बॉडीवरुन धनश्री आणि युझीला ट्रोल केले आहे. फोटोवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले आहे की, युजीभाईंची बॉडी बोलली तर OP आहे. त्याचवेळी दुसऱ्या युजरने कमेंट केली की, जर पैसे असेल तर काय नाही होऊ शकत".

धनश्री वर्माने याआधीही काही फोटो पोस्ट केले आहेत. पहिल्या फोटोत तो वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजसोबत दिसत आहे. यानंतर तिने एक व्हिडिओही पोस्ट केला आहे. त्यात ती सांगत आहे की, 'ती सिडनीला जात आहे. धनश्रीशिवाय चहलचाही एक फोटो व्हायरल झाला होता. तो फोटो नेदरलँडविरुद्धच्या सामन्यादरम्यानचा होता. त्या फोटोमध्ये तो बाउंड्री लाईनजवळ त्याच्या सिग्नेचर स्टेपमध्ये बसला होता. चहलची ही पोझ चाहत्यांना खूप आवडते. या पोझमधील त्याचे फोटोही खूप चर्चेत येतात.

Whats_app_banner