मराठी बातम्या  /  क्रीडा  /  kedar jadhav IPL 2023 : मराठी कॉमेंट्री करत असलेल्या केदार जाधवला RCB चं बोलावणं, या ऑलराऊंडरच्या जागी खेळणार

kedar jadhav IPL 2023 : मराठी कॉमेंट्री करत असलेल्या केदार जाधवला RCB चं बोलावणं, या ऑलराऊंडरच्या जागी खेळणार

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
May 01, 2023 06:03 PM IST

kedar jadhav replacement for david willey IPL 2023: मराठमोळ्या केदार जाधवची आयपीएलमध्ये एन्ट्री झाली आहे. तो पुढील सामने आरसीबीकडून खेळताना दिसणार आहे.

kedar jadhav IPL 2023
kedar jadhav IPL 2023

kedar jadhav rcb IPL 2023 : टीम इंडियाचा फलंदाज केदार जाधवची आयपीएल 2023 मध्ये एन्ट्री झाली आहे. आयपीएल १६ मध्ये खेळाडूंना दुखापतींचे ग्रहण लागले आहे. अशातच आरसीबीचा ऑलराऊंडर डेव्हिड विली दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर पडला आहे. यामुळे आता रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने (RCB) जखमी डेव्हिड विलीच्या जागी केदार जाधवला त्यांच्या संघाचा भाग बनवण्याची घोषणा केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

आरसीबीने केदार जाधवला त्याच्या १ कोटी रुपयांच्या बेस प्राईसमध्ये संघात समाविष्ट केले आहे. विली या हंगामात आरसीबीसाठी केवळ ४ सामने खेळू शकला, ज्यामध्ये त्याने ३ विकेट घेतल्या.

केदार जाधव मिनी ऑक्शनमध्ये अनसोल्ड राहिला होता.यानंतर तो जिओ सिनेमासाठी मराठी भाषेत कॉमेंट्री करत होता करत होता. २०१० च्या मोसमात केदार जाधवने आयपीएलमध्ये पदार्पण केले होते.

केदार जाधवचे आयपीएल करिअर

जाधवने आयपीएलमध्ये आतापर्यंत ९३ सामने खेळले असून त्यापैकी ८० डावात फलंदाजी करताना २२.१५ च्या सरासरीने एकूण ११९६ धावा केल्या आहेत. यादरम्यान जाधवच्या बॅटमधून ४ अर्धशतकांच्या खेळी पाहायला मिळाल्या. जाधव यापूर्वीही आरसीबी संघाचा भाग होता, ज्यामध्ये त्याला संघाकडून एकूण १७ सामने खेळण्याची संधी मिळाली.

आरसीबीने आतापर्यंत ८ पैकी ४ सामने जिंकले

आयपीएलच्या या हंगामात आरसीबने आतापर्यंत ८ पैकी ४ सामने जिंकले आहेत. संघाची मधळी फळी सातत्याने फ्लॉप ठरत आहे. त्यामुळे आरसीबीला या मोसमात अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही. आता केदार जाधवला संघात सामील करून घेतल्यानंतर संघाला बळकटी येईल, अशी अपेक्षा फ्रेंचायझीला असेल. केदार जाधव विकेटकिपिंगसुद्धा करतो. त्यामुळे फॉर्मात नसलेल्या दिनेश कार्तिकला पुढच्या सामन्यातून वगळले जावू शकते.

WhatsApp channel

विभाग