मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IPL 2023: नवीन उल हकनं पुन्हा विराटला डवचलं; आरसीबी स्पर्धेतून बाहेर होताच त्यानं...

IPL 2023: नवीन उल हकनं पुन्हा विराटला डवचलं; आरसीबी स्पर्धेतून बाहेर होताच त्यानं...

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
May 22, 2023 08:05 PM IST

Naveen-ul-Haq On Virat Kohli: गुजरातविरुद्धच्या पराभवानंतर आरसीबीचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला.

Naveen-ul-Haq, Virat Kohli
Naveen-ul-Haq, Virat Kohli

IPL 2023: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात काल आयपीएल २०२३ मधील शेवटचा साखळी सामना खेळण्यात आला. या सामन्यात गुजरातच्या संघाने आरसीबीचा सहा विकेट्सने पराभव केला. या पराभवासह आरसीबीचे पुन्हा एकदा आयपीएलची ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न भंगले. आरसीबीच्या पराभवानंतर लखनौचा नवीन उल हकने सोशल मीडियाद्वारे पुन्हा विराट कोहलीला डवचलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात गतविजेत्या गुजरातविरुद्ध १९८ धावांचा बचाव करण्यात आरसीबीचा संघ अपयशी ठरला. या पराभवामुळे विराट कोहलीचे आयपीएल जिंकण्याचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले. आरसीबीच्या पराभवानंतर नवीन उल हकने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक मीम शेअर केला. ज्यात टीव्ही अँकर सतत हसताना दिसतोय आणि टाळ्या वाजवतोय. या मीममध्ये नवीन उल हकने विराटचे नाव लिहिले नाही. परंतु, हे मीम त्याने विराट कोहलीसाठीच ठेवल्याचे बोलले जात आहे.

लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात मे महिन्याच्या सुरुवातीला एकना स्टेडियमवर सामना खेळण्यात आला होता. या सामन्यात विराट कोहलीने नवीन-उल-हकची स्लेजिंग केली होती. या सामन्यानंतर विराट कोहली आणि नवीन उल हकमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर लखनौचा मार्गदर्शक गौतम गंभीर आणि विराट यांच्यात वाद झाल्याचे पाहायला मिळाले. तेव्हापासून विराट कोहली आणि नवीन उल हकमध्ये वाद सुरु झाला आहे.

WhatsApp channel

विभाग