मराठी बातम्या  /  क्रीडा  /  WTC 2023 Final: विराट कोहलीसह ७ खेळाडू उद्या लंडनला रवाना होणार

WTC 2023 Final: विराट कोहलीसह ७ खेळाडू उद्या लंडनला रवाना होणार

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
May 22, 2023 06:45 PM IST

ऑस्ट्रेलियाविरुद्ध डब्लूटीसीची फायनल खेळण्यासाठी विराटसह सात खेळाडू उद्या लंडनला रवाना होणार आहेत.

Virat Kohli
Virat Kohli

WTC 2023 Final: आयपीएलच्या सोळाव्या हंगामातील साखळी सामने संपले असून उद्या गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात पहिला नॉकआऊट सामना खेळला जाणार आहे. तर, २८ मे २०२३ रोजी लीगमधील अंतिम सामना खेळला जाईल. त्यानंतर भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध डब्लूटीसीची फायनल खेळायची आहे. हा सामना लंडनच्या ओव्हल मैदानावर ७ जून ते ११ जून कालावधीत खेळवला जाणार आहे. या सामन्याची तयारी म्हणून भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीसह सात खेळाडू उद्या लंडनसाठी रवाना होणार आहेत. त्यांच्यासोबत भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड देखील असणार आहेत.

लंडनसाठी उद्या रवाना होणाऱ्या खेळाडूंमध्ये विराट कोहली, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट आणि आर अश्विन यांचा समावेश आहे. आयपीएलमधील या खेळाडूंचा प्रवास आता संपला आहे. याशिवाय, अनिकेत चौधरी, आकाश दीप आणि यारा पृथ्वीराजा यांना नेट बॉलर म्हणून पाठवण्यात येणार आहे. दुसरीकडे रोहित शर्माचा संघ मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये दाखल झाला. रोहित शर्मा आयपीएलच्या अंतिम सामन्याच्या एका दिवसानंतर म्हणजे २९ मे २०२३ रोजी लंडनला रवाना होऊ शकतो आणि उर्वरित संघ देखील त्याच्यासोबत जातील.

डब्लूटीसीच्या अंतिम सामन्यापूर्वी दुखापतीने भारतीय संघाचे टेन्शन वाढवलं आहे. दुखापतीमुळे भारताचे पाच खेळाडू संघाबाहेर गेले आहेत. ज्यात जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत, जयदेव उनादकट यांसारख्या खेळाडूंचा समावेश आहे. गुजरातविरुद्ध बंगळुरुच्या सामन्यात विराट कोहलीलाही दुखापत झाल्याचं सांगितले जात आहे. यामुळे त्याच्या फिटनेटसबाबत काय अपडेट येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले.

WhatsApp channel

विभाग