मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Harmanpreet Kaur : धोनी, विराट-रोहित बघत राहिले... हरमनप्रीत कौरनं 'हा' पराक्रम करून दाखवला

Harmanpreet Kaur : धोनी, विराट-रोहित बघत राहिले... हरमनप्रीत कौरनं 'हा' पराक्रम करून दाखवला

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Feb 20, 2023 09:37 PM IST

Harmanpreet Kaur 150th T20I match : महिला T20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ आयर्लंडविरुद्ध चौथा सामना खेळत आहे. या सामन्याद्वारे हरमनप्रीत कौरने इतिहास रचला आहे. ती तिचा १५० टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळत आहे. याबाबतीत पुरुष क्रिकेटपटूही तिच्या मागे आहेत.

Harmanpreet Kaur 150th T20I match
Harmanpreet Kaur 150th T20I match

IND W vs IRE W T20 World Cup : महिला टी-20 वर्ल्डकपमध्ये आज (२० फेब्रुवारी) भारताचा सामना आयर्लंडशी होत आहे. या सामन्यातील विजयासह भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचणार आहे. इंग्लंडचा संघ यापूर्वीच ग्रुप-बी अर्थात भारताच्या गटातून उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला आहे. सेंट जॉर्ज पार्क स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

या वर्ल्डकपमधील २ सामने भारताने जिंकले आहेत. त्याचवेळी भारताला एका सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. आयर्लंडविरुद्ध खेळला जाणारा हा सामना भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरसाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण या सामन्याद्वारे ती तिचा १५० वा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळत आहे. यासह ती १५० टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी जगातील पहिली क्रिकेटर बनली आहे. अशी कामगिरी अद्याप पुरुष क्रिकेटपटूंनाही करता आलेली नाही.

१५० T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी पहिला क्रिकेटर

हरमनप्रीत कौर ही T20 आंतरराष्ट्रीय इतिहासातील पहिली खेळाडू ठरली आहे, जिने १५० T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या बाबतीत तिने भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मालाही मागे टाकले आहे. रोहित शर्माने त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत एकूण १४८ टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

हरमनप्रीत कौरने जून २००९ मध्ये T20 आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते, तर रोहित शर्माने सप्टेंबर २००७ मध्ये पहिला T20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.

हरमनप्रीत कौरची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्द -

हरमनप्रीत कौरने १४८ टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या १३४ डावांमध्ये २७.९७ च्या सरासरीने २९९३ धावा केल्या आहेत. यामध्ये तिने आतापर्यंत १ शतक आणि ९ अर्धशतके झळकावली आहेत. तिची फलंदाजीतील सर्वोच्च धावसंख्या १०३ धावा आहे. तर गोलंदाजीत तिने ३२ विकेट्स घेतल्या आहेत. (हमरानप्रीत कौरचे हे आकडे १४९ सामन्यांपर्यंतचे आहेत ती तिचा १५० वा सामना खेळत आहे.)

तसेच, हरमप्रीतने टीम इंडियासाठी एकूण ३ कसोटी, १२४ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामनेदेखील खेळले आहेत. कसोटीच्या ५ डावात फलंदाजी करताना तिने ३८ धावा केल्या आहेत. याशिवाय एकदिवसीय सामन्यांच्या एकूण १२४ डावांमध्ये त्याने ३८.१८ च्या सरासरीने ३३२२ धावा केल्या आहेत. यामध्ये तिने ५ शतके आणि १७ अर्धशतके केली आहेत. त्याच वेळी, तिची सर्वोच्च धावसंख्या नाबाद १७१ आहे.

WhatsApp channel

संबंधित बातम्या