मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Mukesh Kumar: टीम इंडियाच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये अ‍ॅड झालो अन्... मुकेश कुमारची पहिली प्रतिक्रिया

Mukesh Kumar: टीम इंडियाच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये अ‍ॅड झालो अन्... मुकेश कुमारची पहिली प्रतिक्रिया

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Oct 03, 2022 03:04 PM IST

Mukesh Kumar IND vs SA ODI Series: बंगालकडून खेळणारा वेगवान गोलंदाज मुकेश कुमारचा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियामध्ये समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे भारतीय संघाच्या अधिकृत व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सामील होईपर्यंत मुकेशला त्याच्या निवडीबद्दल माहिती नव्हती. व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये अॅड केल्यावर त्याला कळले की, त्याची आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी निवड झाली आहे.

Mukesh Kumar
Mukesh Kumar

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिका खेळल्यानंतर टीम इंडिया तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. या संघाचा कर्णधार शिखर धवन, तर उपकर्णधार श्रेयस अय्यरला करण्यात आले. वनडे मालिकेसाठी टीम इंडियामध्ये अनेक नवीन खेळाडूंनाही संधी देण्यात आली आहे. या खेळाडूंमध्ये बंगालकडून खेळणारा वेगवान गोलंदाज मुकेश कुमार याचाही समावेश आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मुकेशने ३१ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ११३ बळी घेतले आहेत. तसेच, १८ लिस्ट ए सामन्यांंमध्ये मध्ये १७ बळी घेतले आहेत.

मुकेश कुमारला वडिलांची आठवण

टीम इंडियात निवड झाल्यानंतर मुकेश कुमारला वडिलांची आठवण झाली आहे. आपल्या वडिलांची आठवण करून त्यांनी सांगितले की, “मी भावूक झालो. मला हे सगळं एखाद्या स्वप्नाप्रमाणे वाटत होतं. मला फक्त माझे दिवंगत वडील काशीनाथ सिंह यांचा चेहरा आठवतोय. जोपर्यंत मी बंगालसाठी रणजी करंडक खेळलो तोपर्यंत माझ्या वडिलांना मी व्यावसायिकदृष्ट्या क्रिकेटर आहे यावर विश्वास बसत नव्हता. मी सक्षम खेळाडू नाही असे माझ्या वडिलांना नेहमी वाटायचे".

रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यापूर्वी मुकेश कुमारच्या वडिलांचे 'ब्रेन स्ट्रोक'ने निधन झाले. मुकेशचे वडील आजारी असताना मुकेश सकाळी प्रॅक्टिसला जायचा आणि बाकीचा वेळ वडिलांसोबत हॉस्पिटलमध्ये बेडजवळ घालवायचा. आईबद्दल पुढे बोलताना तो म्हणाला, "आज माझी आईदेखील खूप भावूक झाली. माझी टीम इंडियात निवड झाल्याचे ऐकून घरातले सगळे रडायला लागले होते".

विशेष म्हणजे भारतीय संघाच्या अधिकृत व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सामील होईपर्यंत मुकेशला त्याच्या निवडीबद्दल माहिती नव्हती. व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये अॅड केल्यावर त्याला कळले की, त्याची आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी निवड झाली आहे.

वडिलांना वाटायचे मी सरकारी नोकरी करावी

आपल्या मुलाने सरकारी नोकरी करावी, अशी मुकेश कुमार यांच्या वडिलांची इच्छा होती. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. सरकारी नोकरीसाठी मुकेश कुमारने केंद्रीय राखीव पोलीस दलाची (CRPF) तीनदा परिक्षा दिली. मात्र, त्याची सीआरपीएफमध्ये निवड होऊ शकली नाही. पण प्रथम श्रेणी क्रिकेटपटू म्हणून मुकेश सीएजी (नियंत्रक आणि महालेखापरीक्षक कार्यालय) मध्ये काम करतो.

मुकेश कुमारकडे चेंडू दोन्ही दिशेला स्विंग करण्याची अप्रतिम कला आहे. याबाबत बोलताना तो म्हणाले, “तुमच्या हातात असलेल्या सर्व कला ही देवाने दिलेली देणगी आहे. पण भगवंताने दिलेल्या आशीर्वादावर मेहनत घेतली नाही काहीच होणार नाही. सर्व काही व्यर्थ होईल”.

WhatsApp channel

संबंधित बातम्या