मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Rohit Sharma Video: राष्ट्रगीतादरम्यान रोहित शर्मा रडला, डोळ्यात अश्रू तरळले
Rohit Sharma Gets Emotional
Rohit Sharma Gets Emotional (social media)

Rohit Sharma Video: राष्ट्रगीतादरम्यान रोहित शर्मा रडला, डोळ्यात अश्रू तरळले

23 October 2022, 14:03 ISTRohit Bibhishan Jetnavare

Rohit Sharma Gets Emotional During The National Anthem: मेलबर्नमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात टी-20 विश्वचषक सामना खेळला जात आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रगीत सुरु असताना रोहित शर्मा भावूक झालेला पाहायला मिळाला.

मेलबर्नमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात टी-20 विश्वचषक सामना खेळला जात आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामन्यापूर्वी राष्ट्रगीत सुरू असताना टीम इंडियाचे सर्व खेळाडू उत्साहात दिसले. त्याचवेळी कर्णधार रोहित भावूक झालेला दिसला. त्याच्या डोळ्यातून अश्रू तरळत होते. रोहितने कसेतरी आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवले.

ट्रेंडिंग न्यूज

हा सामना जिंकून दोन्ही संघांना आपल्या मोहिमेची सुरुवात करायची आहे. भारताने रविचंद्रन अश्विनचा प्लेइंग ११ मध्ये समावेश केला आहे. युझवेंद्र चहल या सामन्यात खेळत नाही. हर्षल पटेललाही संघात ठेवण्यात आलेले नाही. दुसरीकडे, पाकिस्तानी संघात फखर जमानचा समावेश करण्यात आलेला नाही.

भारतीय फलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर, रोहित शर्मा, केएल राहुल आणि विराट कोहली शीर्ष क्रमात आहेत. मधल्या फळीची जबाबदारी सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या आणि दिनेश कार्तिक यांच्यावर आहे. कार्तिकसह अक्षर पटेल आणि रविचंद्रन अश्विन यांच्यावर खालच्या फळीत धावा करण्याची जबाबदारी असेल. गोलंदाजीत मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार यांना अर्शदीप सिंगची साथ मिळेल. अश्विन आणि अक्षर पटेल फिरकीची जादू दाखवतील. हार्दिक हा चौथा वेगवान गोलंदाज असेल.

भारत प्लेइंग-११

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग.

पाकिस्तान प्लेइंग-११

बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), शान मसूद, हैदर अली, मोहम्मद नवाज, शादाब खान, इफ्तिखार अहमद, आसिफ अली, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ, नसीम शाह.