मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  IND vs PAK T20: द्रविड-शोएब ते धोनी-आफ्रिदी, भारत-पाक क्रिकेटमधील 'हे' वाद कधीच विसरता येणार नाहीत

IND vs PAK T20: द्रविड-शोएब ते धोनी-आफ्रिदी, भारत-पाक क्रिकेटमधील 'हे' वाद कधीच विसरता येणार नाहीत

Oct 23, 2022 11:23 AM IST Rohit Bibhishan Jetnavare
  • twitter
  • twitter

  • T20 World Cup-India vs pakistan cricket fights: T20 विश्वचषकात आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात महामुकाबला रंगणार आहे. ऐतिहासिक मेलबर्न क्रिकेट मैदानावर दोन्ही संघ एक लाख प्रेक्षकांसमोर खेळतील. दोन्ही देशांमध्ये आजवर अनेक रोमांचक सामने झाले आहेत. या थरारक सामन्यांदरम्यान दोन्ही देशांतील खेळाडूही अनेकदा एकमेकांशी भिडताना दिसले आहेत. अशाच काही भांडणांची माहिती आज आपण पाहणार आहोत. खेळाडूंमधील ही भांडणे क्रिकेट चाहत्यांना विसरणे जवळपास अशक्य आहे.

T20 विश्वचषकात आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात महामुकाबला रंगणार आहे. ऐतिहासिक मेलबर्न क्रिकेट मैदानावर दोन्ही संघ एक लाख प्रेक्षकांसमोर खेळतील. सध्या सुरू असलेल्या टी-२० विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा पहिला सामना असेल. दोन्ही संघांना विजयाने सुरुवात करायची आहे. गेल्या टी-२० विश्वचषकातील पराभवाचा बदला घेण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. या सामन्यात रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. तर बाबर आझमच्या खांद्यावर पाकिस्तानी संघाची धुरा असेल.
twitterfacebookfacebook
share

(1 / 8)

Venkatesh Prasad vs Aamer Sohail: व्यंकटेश प्रसाद आणि अमीर सोहेल यांच्यातील हा वाद १९९६ च्या क्रिकेट विश्वचषकात झाला होता. सामन्यात टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना २८७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा आमीर सोहेल वेगाने धावा करत होता, त्यावेळी डावाच्या १५ व्या षटकात प्रसादला त्याने ऑफसाईडला चौकार मारून सीमारेषेकडे बॅट दाखवली. त्यानंतर व्यंकटेशने त्याचा बदला घेत पुढच्याच चेंडूवर आमीर सोहेलचा त्रिफळा उडवला. त्यानंतर व्यंकटेश प्रसादनेही सोहेलला पॅव्हेलियनमध्ये परतण्याचा इशारा केला. पाकिस्तानने तो ३९ धावांनी हरला होता.
twitterfacebookfacebook
share

(2 / 8)

MS Dhoni & Shahid Afridi: धोनीने २००५ मध्ये विशाखापट्टणम वनडेमध्ये १४८ धावांची तुफानी इनिंग खेळली होती. त्या सामन्यात धोनीने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस आला होता. धोनी हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवखा होता, त्यामुळे शाहिद आफ्रिदीसह पाकिस्तानी गोलंदाजांना त्याच्याबद्दल फारशी माहिती नव्हती. त्या इनिंगमध्ये जेव्हा धोनीने आफ्रिदीला कव्हरच्या दिशेने चौकार मारला, तेव्हा आफ्रिदी चांगलाच तापला आणि त्याने धोनीला रागाने काहीतरी म्हटले. यानंतर धोनीने आफ्रिदीला बॅटने प्रत्युत्तर देताना कव्हर रिजनमध्येच शानदार षटकार ठोकला.
twitterfacebookfacebook
share

(3 / 8)

Gautam Gambhri vs Shahid Afridi: २००७ मध्ये कानपूर वनडेत गौतम गंभीर आणि शाहिद आफ्रिदी भिडले होते. गंभीरने आफ्रिदीच्या चेंडूवर चौकार मारला होता. त्यावेळी आफ्रिदी चांगलाच चिडला होता. त्यानंतर पुढच्या चेंडूवर गंभीरने एकेरी धाव घेतली. मात्र, धावताना गंभीरची आणि आफ्रिदी एकमेकांना धडकले. यानंतर दोन्ही खेळाडूंमध्ये जोरदार भांडण झाले, अंपायर इयान गुड यांनी हे प्रकरण शांत केले. नंतर सामनाधिकारी रोशन महानामा यांनी आफ्रिदीला सामन्याच्या फीमधून ९५ टक्के आणि गंभीरला ६५ टक्के दंड ठोठावला.
twitterfacebookfacebook
share

(4 / 8)

Shoaib Akhtar vs Rahul Dravid: शांत, संयमी राहणारा राहुल द्रविड वेगवान गोलंदाज शोएब अख्तरशी भिडला होता. शोएबने एका कार्यक्रमात त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं हे सांगितले होते. शोएब म्हणाला की, "मी त्या दिवशी खूपच वेगाने गोलंदाजी करत होतो. मी पूर्ण लयीत होतो. माझ्या एका चेंडूवर शॉट खेळून द्रविड धाव घेत असताना मला धडकला. त्यानंतर मी त्याला साईडने धावायला सांगितले. यावर तो संतापला आणि माझ्या अंगावर धावला. हे पाहून मला धक्काच बसला. त्यानंतर मी त्याला म्हणालो,  “राहुल, आक्रमक? हे कसं काय? मला माहित आहे की वातावरण बदलत आहे, परंतु मला हे माहीत नव्हते की तु देखील भांडण करु शकतोस”?
twitterfacebookfacebook
share

(5 / 8)

त्यावेळी शोएब आणि द्रविड यांच्यात चांगलीच बाचाबाची झाली होती. पण त्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार इंझमाम-उल-हक आणि शोएब मलिक यांना बचावासाठी यावे लागले. त्यानंतर प्रकरण शांत झाले.
twitterfacebookfacebook
share

(6 / 8)

Harbhajan Singh vs Shoaib Akhtar : २०१० च्या आशिया कपमध्ये शोएब अख्तर आणि हरभजन सिंग यांच्यातील भांडण कोण विसरू शकेल?. भारतीय डावाच्या ४९ व्या षटकात बाऊन्सर टाकल्यानंतर शोएब अख्तरने हरभजन सिंगला चिथावणी देण्याचा प्रयत्न केला. मग काय, मैदानावर दोघांमध्ये जोरदार वादावादी सुरू झाली. नंतर शेवटच्या षटकात हरभजन सिंगने मोहम्मद अमीरच्या चेंडूवर षटकार ठोकत भारताला विजय मिळवून दिला. विजय मिळवल्यानंतर हरभजन सिंगने शोएब अख्तरच्या दिशेने पाहत जल्लोषात विजय साजरा केला.
twitterfacebookfacebook
share

(7 / 8)

India vs pakistan cricket fights- T20 World Cup 2022
twitterfacebookfacebook
share

(8 / 8)

India vs pakistan cricket fights- T20 World Cup 2022(all photo- hindustan times)

WhatsApp channel

इतर गॅलरीज