मराठी बातम्या  /  क्रीडा  /  MS Dhoni IPL 2023 : नाणेफेकीवेळी महेंद्रसिंह धोनीचं निवृत्तीबाबत मोठं वक्तव्य, म्हणाला...

MS Dhoni IPL 2023 : नाणेफेकीवेळी महेंद्रसिंह धोनीचं निवृत्तीबाबत मोठं वक्तव्य, म्हणाला...

May 03, 2023 05:48 PM IST

MS Dhoni Retirement : सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी आयपीएल झाल्यानंतर क्रिकेटच्या सर्व फॉर्मॅटमधून निवृत्ती घेणार असल्याचं बोललं जात आहे.

MS Dhoni Retirement From IPL
MS Dhoni Retirement From IPL (AP)

MS Dhoni Retirement From IPL : यंदाचा आयपीएल हंगाम संपल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा आयपीएलमधून निवृत्ती घेणार असल्याची चर्चा सुरू आहे. वनडे आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर आता धोनी अखेरचा आयपीएल खेळणार असल्याचं बोललं जात आहे. परंतु आता खुद्द महेंद्रसिंह धोनीने आयपीएलमधून निवृत्त होणार की नाही?, याबाबतचा खुलासा केला आहे. सीएसके आणि लखनौत होत असलेल्या सामन्यापूर्वी त्याने याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. त्यामुळं आता महेंद्रसिंह धोनीच्या वक्तव्यावरून सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे.

सीएसके आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील सामन्यापूर्वी नाणेफेक झाली. त्यावेळी धोनीने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी न्यूझीलंडचा माजी खेळाडू आणि आयपीएलमधील समालोचक डॅनी मॉरिसन यांनी धोनीला निवृत्तीबाबत प्रश्न केला. त्यावर बोलताना महेंद्रसिंह धोनी म्हणाला की, हे माझं शेवटचं आयपीएल आहे, हे तुम्ही ठरवलं आहे. मी अजून निवृत्तीबाबत काहीही बोललेलो नाही, असं वक्तव्य धोनीने करताच चाहत्यांमध्ये आनंद व्यक्त केला आहे. कारण आता धोनीने पुढच्या आयपीएलमध्येही खेळण्याचे संकेत दिले आहे.

LSG vs CSK IPL 2023 : सीएसकेच्या फिरकीसमोर लखनौची दाणादाण, पावसामुळं खेळ थांबला

डावाच्या सुरुवातीलाच सीएसकेच्या फिरकीपटूंनी लखनौचा चार धक्के दिले आहे. याशिवाय कोरडी खेळपट्टी असल्यामुळं चेंडू टर्न होत आहे. त्यामुळं लखनौच्या फलंदाजांना वेगाने धावा करण्यास अडचणी येत आहे. त्यातच आता सामना सुरू झाल्यापासून पावसाने लखनौत हजेरी लावली आहे. त्यामुळं दोनदा सामना थांबवावा लागला. त्यामुळं आता यंदाच्या आयपीएलमध्ये सलग तिसऱ्या दिवशी लोव्ह स्कोरिंग सामना पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

ट्रेंडिंग न्यूज
WhatsApp channel