Kohli vs Naveen : ‘भारतात खेळायला आलोय, शिव्या ऐकण्यासाठी नाही’, नवीन उल-हकचा कोहलीला टोला
Virat Kohli and Naveen Ul Haq Fight : लखनौ आणि आरसीबीत झालेल्या सामन्यात विराट कोहली आणि नवीन उल-हक यांच्या वाद झाला होता.
Virat Kohli and Naveen Ul Haq Fight IPL 2023 : आयपीएलमध्ये सोमवारी झालेल्या सामन्यात विराट कोहली आणि नवीन उल-हक यांच्यात जोरदार वादावादी झाल्याचं पाहायला मिळालं. लखनौचे फलंदाज एकामागून एक बाद होत असताना विराट कोहली आक्रमकपणे सेलिब्रेशन करत होता. त्याचवेळी फलंदाजी करत असलेल्या नवीन उल-हक आणि विराट कोहली यांच्यात जोरदार वाद झाला. त्यानंतर लखनौचा मेंटॉर गौतम गंभीर आणि विराट कोहली यांच्यातही जोरदार वादावादी झाली. त्यामुळं आता आयपीएलमध्ये सामना संपल्यानंतरही भांडणाऱ्या खेळाडूंवर सोशल मीडियावर टीका केली जात आहे. त्यातच आता लखनौचा गोलंदाज नवीन उल-हकने घडलेल्या प्रकाराबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
ट्रेंडिंग न्यूज
समोर आलेल्या एका रिपोर्टनुसार, विराट कोहलीशी वाद झाल्यानंतर बोलताना लखनौचा नवीन उल-हक म्हणाला की, मी भारतात आयपीएल खेळण्यासाठी आलो आहे. कुणाच्या शिव्या ऐकण्यासाठी मी इथे आलेलो नाही. त्यामुळं आता नवीनच्या या वक्तव्यावरून पुन्हा वाद पेटण्याची शक्यता आहे. सामन्यात झालेल्या वादावादीनंतर विराट कोहली आणि नवीन उल-हक यांनी इन्स्टाग्रामवर वाकयुद्ध रंगलं होतं. त्यानंतर आता मी भारतात खेळण्यासाठी आलोय, शिव्या ऐकण्यासाठी नाही, असं म्हणत नवीनने कोहलीशी झालेल्या वादावर प्रतिक्रिया दिली आहे.
Kohli Gambhir Fight : आयपीएलममध्ये भांडणाऱ्या विराट-गंभीरला अनिल कुंपळेने झापलं, म्हणाला…
लखनौ आणि आरसीबीत झालेल्या सामन्यात वाद घालणाऱ्या विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्या मॅच फीसमध्ये १०० टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. तर लखनौचा वेगवान गोलंदाज नवीन उल-हकच्या मॅच फीसमध्ये ५० टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. आयपीएलमधील खेळाडूंच्या वादानंतर भारताच्या अनेक माजी खेळाडूंनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.