मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Watch : आशिष नेहराचा मुलगा बापापेक्षाही पुढे, वडिलांची सेम टू सेम कॉपी, पाहाच!

Watch : आशिष नेहराचा मुलगा बापापेक्षाही पुढे, वडिलांची सेम टू सेम कॉपी, पाहाच!

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
May 01, 2023 04:12 PM IST

ashish nehra son viral video : गुजरात टायटन्सचे प्रशिक्षक आशिष नेहरा अनेकदा आपल्या कोचिंग स्टाईलमुळे चर्चेत राहतात. आता आशिष नेहराच्या मुलाने वडिलांची कॉपी करण्याचा प्रयत्न केला आहे. याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

ashish nehra son viral video
ashish nehra son viral video

ashish nehra son viral video : गुजरात टायटन्सचे प्रशिक्षक आशिष नेहरा यांच्या मुलाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आशिष नेहराच्या मुलाने वडिलांची कॉपी करण्याचा प्रयत्न केला आहे. गुजरात टायटन्सने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे.

सोशल मीडियावरील चाहत्यांना 'ज्युनियर नेहरांजीची ही फनी स्टाइल चांगलीच आवडली असल्याचे दिसते आहे. सोशल मीडिया यूजर्स या व्हिडीओवर कमेंट करून हा व्हिडीओ शेअर करत आहेत.

व्हायरल व्हिडीओत काय?

वास्तविक, गुजरात टायटन्सचे प्रशिक्षक आशिष नेहरा सामन्यादरम्यान खूप सक्रिय असतात. ते अनेकदा खेळाडूंना हातवारे करून किंवा सीमारेषेवर उभे राहून सल्ले देत असतात. क्रिकेट चाहते आशिष नेहराला 'नेहरा जी' म्हणून हाक मारतात.

आता नेहराजींचा मुलगा 'ज्युनियर नेहराजी' याने वडिलांची हीच शैली कॉपी करण्याचा प्रयत्न केला आहे. 'ज्युनियर नेहराजीं'चा हा व्हिडीओ शेअर करताना गुजरात टायटन्सने व्हिडिओ कॅप्शनमध्ये लिहिले आहे की "नेहराची खरी कॉपी... 'ज्युनियर नेहरा'.

गुजरात टायटन्स गुणतालिकेत अव्वल

गुजरात टायटन्सचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी आहेत. त्यांचा याआधीचा सामना (२९ एप्रिल) कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध झाला. या सामन्यात गुजरात टायटन्सनेसं ७ विकेट्सने विजय मिळवला. गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर प्रथम फलंदाजी करताना केकेआरने २० षटकांत ७ गडी गमावून १७९ धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरातने १७.५ षटकांत लक्ष्य गाठले. संघातर्फे विजय शंकरने ५१ धावांची सर्वात मोठी खेळी खेळली. 

WhatsApp channel