मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Arjun Tendulkar: अर्जुनची चंदिगढमध्ये स्पेशल ट्रेनिंग, युवीचे वडील देतायंत क्रिकेटचे धडे
Arjun Tendulkar
Arjun Tendulkar

Arjun Tendulkar: अर्जुनची चंदिगढमध्ये स्पेशल ट्रेनिंग, युवीचे वडील देतायंत क्रिकेटचे धडे

23 September 2022, 18:28 ISTRohit Bibhishan Jetnavare

Arjun Tendulkar and yograj singh: अर्जुन तेंडुलकर हा वेगवान गोलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडू आहे. त्याला अद्याप आयपीएलमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळालेली नाही. अर्जुन सध्या युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांच्याकडून प्रशिक्षण घेत आहे.

महान क्रिकेटर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर सध्या चंदीगडमध्ये स्पेशल ट्रेनिंग घेत आहे. येथील डीएव्ही कॉलेज क्रिकेट अकादमीमध्ये तो गोलंदाजी आणि फलंदाजीत सुधारणा करण्याचा प्रयत्न करत आहे. विशेष म्हणजे तो टीम इंडियाचा माजी क्रिकेटर युवराज सिंगचे वडील योगराज सिंह यांच्याकडून प्रशिक्षण घेत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

योगराज सिंग यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर अर्जुनला ट्रेनिंग देताना अनेक व्हिडिओ आणि फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अर्जुन कठोर मेहनत करताना दिसत आहे. योगराज सिंग यांनी आपला मुलगा युवराजला लहानपणापासूनच क्रिकेटचे बारकावे शिकवले आहेत. युवराज सिंग टीम इंडियाच्या T20 विश्वचषक आणि एकदिवसीय विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य होता.

अर्जुनला अजून मोठी कामगिरी करता आलेली नाही

अर्जुन तेंडुलकर हा वेगवान गोलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडू आहे. तो आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा आणि रणजी ट्रॉफीमध्ये मुंबई संघाचा भाग होता. पण त्याला आतापर्यंत आयपीएलमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली नाही. नुकताच तो देशांतर्गत क्रिकेटमधील मुंबईचा संघ सोडून गोवा संघात दाखल झाला आहे. या मोसमात तो गोव्याकडून खेळताना दिसणार आहे.