मराठी बातम्या  /  क्रीडा  /  MS Dhoni: सचिन, सेहवागप्रमाणं धोनी इतर लीगमध्ये का खेळत नाही? ‘हे’ आहे खरं कारण

MS Dhoni: सचिन, सेहवागप्रमाणं धोनी इतर लीगमध्ये का खेळत नाही? ‘हे’ आहे खरं कारण

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Sep 23, 2022 05:49 PM IST

why MS Dhoni cant play other cricket leagues: भारतीय दिग्गज खेळाडू सुरेश रैना आणि रॉबिन उथप्पा यांनी भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. रैना सध्या लीजेंड्स क्रिकेट लीग खेळत आहे. त्याचबरोबर आता रॉबिन उथप्पालादेखील लीग क्रिकेट खेळण्याची परवानगी मिळणार आहे.

MS Dhoni
MS Dhoni (hindustan times)

टीम इंडियाचा माजी महेंद्रसिंग धोनीने २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. धोनी ज्या स्पर्धेत सहभागी होतो ती स्पर्धा प्रचंड लोकप्रिय होते. पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही महेंद्रसिंग धोनी IPL व्यतिरिक्त कोणत्याही मोठ्या लीगमध्ये का खेळू शकत नाही हे तुम्हाला माहीत आहे का? तर यामागचे खरे कारण काय आहे ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

वास्तविक, BCCI च्या नियमांनुसार, जर खेळाडूंना बीसीसीआयच्या छत्र छायेबाहेरील कोणत्याही संघासाठी खेळायचे असेल किंवा प्रशिक्षकाची भूमिका बजावायची असेल, तर त्या खेळाडूला भारतीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घ्यावी लागते. धोनी आयपीएल खेळत असल्याने त्याला कोणत्याही इतर क्रिकेट स्पर्धेत भाग घेण्याची परवानगी नाही. जर त्याला लिजेंड्स लीग खेळायची असेल तर त्याला IPL मधूनही निवृत्ती घ्यावी लागेल.

धोनीने आधीच स्पष्ट केले आहे की, तो २०२३ चे IPL खेळणार आहे. अलीकडेच भारतीय दिग्गज खेळाडू सुरेश रैना आणि रॉबिन उथप्पा यांनी भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. रैना सध्या लीजेंड्स क्रिकेट लीग खेळत आहे. त्याचबरोबर आता रॉबिन उथप्पालादेखील लीग क्रिकेट खेळण्याची परवानगी मिळणार आहे. तो बिग बॅश लीग, द हंड्रेड, व्हिटॅलिटी टी-20 ब्लास्ट यांसारख्या कोणत्याही स्पर्धेसाठी साइन अप करू शकतो.

WhatsApp channel

संबंधित बातम्या