मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Yuvraj Singh: युवराजने उडवली रोहित शर्माची खिल्ली; सोबतच म्हणाला, भारत आशिया कप हरला हे चांगलं झालं!

Yuvraj Singh: युवराजने उडवली रोहित शर्माची खिल्ली; सोबतच म्हणाला, भारत आशिया कप हरला हे चांगलं झालं!

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Sep 20, 2022 08:00 PM IST

Yuvraj Singh and Rohit Sharma india vs aus: मोहालीच्या IS बिंद्रा क्रिकेट स्टेडियमवर एक अलीशान पव्हेलियन बांधण्यात आले आहे. या अलीशान पव्हेलियनला माजी क्रिकेटर युवराज सिंग याचे नाव देण्यात आले आहे.

Yuvraj Singh
Yuvraj Singh

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन T20I सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज मंगळवारी मोहालीच्या IS बिंद्रा क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. या स्टेडियमध्ये एक अलीशान पव्हेलियन बांधण्यात आले आहे. या अलीशान पव्हेलियनला माजी क्रिकेटर युवराज सिंग याचे नाव देण्यात आले आहे. युवराजच्या हस्तेच या पव्हेलियचे अनावरण आजच्या सामन्यापूर्वी करण्यात आले.

दरम्यान या कार्यक्रमावेळी युवराज सामन्यातील कॉमेंट्री पॅनलसोबतही दिसला. या प्रसंगी त्याने २००७ च्या T20 विश्वचषकाच्या काही आठवणी सांगितल्या. तसेच, त्याने ६ चेंडूत ६ षटकार आणि रोहित शर्माच्या पदार्पणाबद्दलही काही आठवणी शेअर केल्या.

युवीने उडवली रोहितची खिल्ली

आजच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा हा देखील युवीला भेटला. या भेटीबद्दलही युवीने सांगितले की, “रोहित आताच मला भेटला होता आणि म्हणाला की मी आता ३५ वर्षांचा झालो आहे. मग मी त्याला म्हणालो की हो के बाहेरून दिसतच आहे”. अशाप्रकारे युवीने रोहितला टोमणा मारत त्याची खिल्ली उडवली.

यानंतर युवराजला टीम इंडियाच्या टी-20 वर्ल्ड कप २०२२ च्या तयारीबद्दल विचारले असता तो म्हणाला की,"लोकांना वाईट वाटले तरी चालेल पण टीम इंडिया आशिया कप हरली हे चांगले झाले आहे".

आशिया कप हरला चांगले झाले

वास्तविक, युवराज सिंगला विचारण्यात आले होते की, तुला भारताची तयारी कशी वाटते? प्रत्युत्तरादाखल तो म्हणाला, "लोकांना वाईट वाटेल, पण मी म्हणेन की संघ आशिया कप हरला हे चांगले झाले आहे. हा असा संघ आहे जो टी-20 विश्वचषक जिंकू शकतो. आम्ही २००७ वनडे विश्वचषकात खराब कामगिरी केली होती. त्यानंतर आम्ही T20 विश्वचषक जिंकला, त्यामुळे आशिया चषकातील हार सकारात्मक घेतली पाहिजे."

WhatsApp channel

संबंधित बातम्या