मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Aaron Finch: ऑस्ट्रेलियन कर्णधार अ‍ॅरॉन फिंच निवृत्त होणार? 'या' दिवशी करणार अधिकृत घोषणा

Aaron Finch: ऑस्ट्रेलियन कर्णधार अ‍ॅरॉन फिंच निवृत्त होणार? 'या' दिवशी करणार अधिकृत घोषणा

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Sep 09, 2022 06:44 PM IST

Aaron Finch likely to announce retirement ODI cricket: ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरॉन एक फिंच मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. फिंच वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याची चर्चा आहे. फिंच शनिवारी सकाळी १०:३० वाजता (भारतीय वेळेनुसार पहाटे ५:०० वाजता) प्रसारमाध्यमांशी संवाद साधणार आहे.

AARON FINCH
AARON FINCH

न्यूझीलंडचा संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये एकदिवसीय मालिका खेळवली जात आहे. या मालिकेत ऑस्ट्रेलिया सध्या २-० ने आघाडीवर आहे. तर मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना रविवारी (११ स्पटेबर) होणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

त्यापूर्वी, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरॉन एक फिंच मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. फिंच वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याची चर्चा आहे. फिंच शनिवारी सकाळी १०:३० वाजता (भारतीय वेळेनुसार पहाटे ५:०० वाजता) प्रसारमाध्यमांशी संवाद साधणार आहे.

दरम्यान, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, एका स्पोर्ट्स वेबसाईटनुसार फिंच त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीच्या भवितव्याबाबत मोठा निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियन कर्णधार दीर्घ काळापासून फॉर्मसाठी संघर्ष करत आहे. त्याच्या खराब कामगिरीमुळे त्याच्या संघातील स्थानाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.फिंचने मागील सात एकदिवसीय डावांमध्ये ०, ५, ५, १, १५, ० आणि ० असा स्कोअर केला आहे.

फिंच त्याच्या T20 आंतरराष्ट्रीय भविष्यावर निर्णय घेतो की नाही हे पाहणे बाकी आहे. या वर्षी जुलैमध्ये, उजव्या हाताच्या फलंदाजाने सूचित केले होते की ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या 2022 ICC T20 विश्वचषकानंतर तो आणि इतर काही खेळाडू खेळातून निवृत्त होऊ शकतात.

अॅरॉन फिंचने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात T20 स्पेशालिस्ट म्हणून केली होती. त्याने २०११ मध्ये इंग्लंडविरुद्ध पदार्पण केले होते. त्याचे वनडे पदार्पण २०१३ मध्ये श्रीलंकेविरुद्ध झाले. फिंचने २०१९ विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व केले आहे. तर त्याच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने २०२१ मध्ये पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकला आहे.

फिंचला २०१८/१९ मध्ये कसोटी संघातही स्थान देण्यात आले होते, परंतु त्याची कसोटी कारकीर्द केवळ ५ सामन्यांची राहिली.

WhatsApp channel

संबंधित बातम्या