त्रिपुरातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याच्या पूर्वसंध्येला मतदान अधिकारी निवडणूक मतदान केंद्रांवर जाण्यासाठी निघाले. अनेक अडचणी पार करत हे मतदान केंद्रांवर पोहोचले.
(PTI)दार्जिलिंग, पश्चिम बंगालमध्ये मतदान केंद्रावर जाण्यासाठी आदल्या दिवशी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. या साठी विशेष गाड्या आणि चोख सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. मतदान केंद्रांवर मतदान साहित्य घेऊन जात असतांना एक अधिकारी.
(ANI)जम्मू आणि काश्मीरच्या जम्मू, केंद्रशासित प्रदेशात सुरक्षा कर्मचारी निवडणूक कर्तव्यासाठी निघाले. येथे निवडणुकीदरम्यान घात पात टाळण्यासाठी चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
(PTI)फेरझॉल, मणिपूर येथे मतदान अधिकारी (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्स) ईव्हीएम, (व्होटर-व्हेरिफाईड पेपर ऑडिट ट्रेल्स) व्हीव्हीपीएटी आणि इतर मतदान साहित्य गोळा केल्यानंतर बोटीतून मतदान केंद्रांवर जात असतांना.
(PTI)राजस्थानमधील चित्तोडगडमध्ये मतदान अधिकारी त्यांच्या बूथकडे जात आहेत. येथे देखील सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आली आहे.
(ANI)उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये मतदान अधिकारी निवडणूक कर्तव्यासाठी जात असतांना. येथील काही मतदान केंद्र संवेदनशील असल्याने या ठिकाणी गैर प्रकार टाळण्यासाठी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
(PTI)मतदान अधिकाऱ्यांना मथुरा येथील वितरण केंद्रावर ईव्हीएम आणि इतर निवडणूक साहित्य मिळते. यावेळी मोठ्या प्रमाणात एकत्र आलेले अधिकारी.
(PTI)