
Kamal Haasan In Bharat Jodo Yatra : राजस्थान आणि हरयातून प्रवास करत राहुल गांधींची भारत जोडो यात्रा दिल्लीत दाखल झाली. त्यानंतर दाक्षिणात्य अभिनेते कमल हासन यांनी पदयात्रेला पाठिंबा देत राहुल गांधीसह रॅलीत सहभागी झाले.
(HT)Bharat Jodo Yatra In Delhi : भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्यानंतर अभिनेते कमल हासन यांनी राहुल गांधींशी मनमोकळेपणानं संवाद साधत चर्चा केली आहे.
(HT)यापूर्वी बॉलिवूडसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी भारत जोडो यात्रेला पाठिंबा दिला होता. त्यानंतर आता कमल हासन यांनी भारत जोडो यात्रेत सहभागी होत राहुल गांधींना पाठिंबा दिला आहे.
(HT)भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्यानंतर अभिनेते कमल हासन म्हणाले की, अनेकजण मला विचारतायंत की, तुम्ही भारत जोडो यात्रेत का सहभागी झालात? परंतु मी एक भारतीय म्हणून येथे आलो आहे. माझे वडील काँग्रेसचे कार्यकर्ते होते. माझी सर्वसमावेशक विचारधारा असून माझा स्वतःचा राजकीय पक्षही आहे.
(HT)परंतु जेव्हा देशाचा विचार केला जातो, तेव्हा सर्व राजकीय पक्षांच्या रेषा धुसर कराव्या लागतात. मी ती रेषा अस्पष्ट करून येथे आलो आहे, असंही कमल हासन यांनी म्हटलं आहे.
(HT)


