(1 / 8)पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी मनसे महायुतीला पाठिंबा देत आहे, असं राज ठाकरे यांनी जाहीर केलं. मात्र, मोदींना पाठिंबा का हे सांगताना त्यांच्या बोलण्यात अनेक विरोधाभास दिसून आले. एकीकडे लाखो उद्योजक बाहेर गेल्याचं राज यांनी सांगितलं. दुसरीकडं त्यांनी महाराष्ट्रातून कररूपानं जाणारा पैसा महाराष्ट्रात येईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. प्रत्यक्षात महाविकास आघाडी सरकारच्या काळात जीएसटीच्या पैशासाठी झगडावं लागत होतं. याबद्दल ते काहीच बोलले नाहीत. त्यामुळं राज ठाकरे नेमकं काय बोलत अशी अवस्था अनेकांची झाली होती. त्याचं प्रतिबिंब सोशल मीडियात उमटलं आहे.