CSK vs MI IPL 2024 : धोनीचे ५ हजार रन्स, रोहितचे ५०० षटकार, मुंबई-सीएसके सामन्यात झाला या विक्रमांचा पाऊस, पाहा-rohit sharma complete 500 sixes in t20 dhoni 5000 runs for chennai super kings these records in csk vs mi match ipl 2024 ,फोटोगॅलरी बातम्या
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  CSK vs MI IPL 2024 : धोनीचे ५ हजार रन्स, रोहितचे ५०० षटकार, मुंबई-सीएसके सामन्यात झाला या विक्रमांचा पाऊस, पाहा

CSK vs MI IPL 2024 : धोनीचे ५ हजार रन्स, रोहितचे ५०० षटकार, मुंबई-सीएसके सामन्यात झाला या विक्रमांचा पाऊस, पाहा

CSK vs MI IPL 2024 : धोनीचे ५ हजार रन्स, रोहितचे ५०० षटकार, मुंबई-सीएसके सामन्यात झाला या विक्रमांचा पाऊस, पाहा

Apr 15, 2024 10:57 AM IST
  • twitter
  • twitter
  • MI vs CSK Records: आयपीएल २०२४ मध्ये रविवारी (१४ एप्रिल) चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात थरारक सामना झाला. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या .ा सामन्यात अनेक मोठे रेकॉर्ड पाहायला मिळाले. या सामन्यात कोण-कोणते रेकॉर्ड झाले ते येथे जाणून घेऊया.
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात आयपीएल २०२४ चा २९ वा सामना खेळला गेला. या सामन्यात चेन्नईने २० धावांनी मुंबईचा धुव्वा उडवला.
share
(1 / 6)
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात आयपीएल २०२४ चा २९ वा सामना खेळला गेला. या सामन्यात चेन्नईने २० धावांनी मुंबईचा धुव्वा उडवला.(PTI)
या सामन्यात सीएसकेने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात २०६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात मुंबईने १८६ धावा केल्या. मुंबईकडून लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्माने नाबाद शतक केले.
share
(2 / 6)
या सामन्यात सीएसकेने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात २०६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात मुंबईने १८६ धावा केल्या. मुंबईकडून लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्माने नाबाद शतक केले.(ANI )
धोनीच्या ५ हजार धावा : एमएस धोनीने चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना ५ हजार धावा पूर्ण केल्या. धोनीने मुंबईविरुद्ध नाबाद २० धावांची नाबाद खेळी खेळली. या खेळीच्या बळावर  त्याने ५ हजार धावांचा आकडा गाठला. चेन्नईसाठी ५ हजार धावा करणारा धोनी दुसरा फलंदाज ठरला. याआधी रैनाने ही कामगिरी केली आहे.
share
(3 / 6)
धोनीच्या ५ हजार धावा : एमएस धोनीने चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना ५ हजार धावा पूर्ण केल्या. धोनीने मुंबईविरुद्ध नाबाद २० धावांची नाबाद खेळी खेळली. या खेळीच्या बळावर  त्याने ५ हजार धावांचा आकडा गाठला. चेन्नईसाठी ५ हजार धावा करणारा धोनी दुसरा फलंदाज ठरला. याआधी रैनाने ही कामगिरी केली आहे.(IPL)
रोहित शर्माचे ५०० षटकार : चेन्नईविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माने आपल्या T20 कारकिर्दीतील ५०० षटकारांचा टप्पा पार केला. हा आकडा गाठणारा रोहित हा पहिला भारतीय आणि जगातील एकूण पाचवा फलंदाज ठरला. T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक १०५६ षटकार मारण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे.
share
(4 / 6)
रोहित शर्माचे ५०० षटकार : चेन्नईविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माने आपल्या T20 कारकिर्दीतील ५०० षटकारांचा टप्पा पार केला. हा आकडा गाठणारा रोहित हा पहिला भारतीय आणि जगातील एकूण पाचवा फलंदाज ठरला. T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक १०५६ षटकार मारण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे.(ANI )
मथिशा पाथिराना : मुंबई विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात, चेन्नईचा वेगवान गोलंदाज मथिशा पाथिरानाने ४ षटकात २८ धावा देऊन ४ बळी घेतले, यासह तो चेन्नईसाठी ४ बळी घेणारा सर्वात युवा गोलंदाज ठरला आहे. वयाच्या २१ वर्षे ११८ दिवसांचा असताना पाथीरानाने ही कामगिरी केली आहे.
share
(5 / 6)
मथिशा पाथिराना : मुंबई विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात, चेन्नईचा वेगवान गोलंदाज मथिशा पाथिरानाने ४ षटकात २८ धावा देऊन ४ बळी घेतले, यासह तो चेन्नईसाठी ४ बळी घेणारा सर्वात युवा गोलंदाज ठरला आहे. वयाच्या २१ वर्षे ११८ दिवसांचा असताना पाथीरानाने ही कामगिरी केली आहे.(PTI)
सीएसकेसाठी २५० सामने : एमएस धोनीचे चेन्नई सुपर किंग्जसाठी २५० सामने पूर्ण झाले आहेत. हा आकडा गाठणारा तो चेन्नईचा पहिला खेळाडू ठरला आहे.
share
(6 / 6)
सीएसकेसाठी २५० सामने : एमएस धोनीचे चेन्नई सुपर किंग्जसाठी २५० सामने पूर्ण झाले आहेत. हा आकडा गाठणारा तो चेन्नईचा पहिला खेळाडू ठरला आहे.(AP)
इतर गॅलरीज