मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Pension: नवीन नियम जारी, सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षअखेरीस मोठा झटका

Pension: नवीन नियम जारी, सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षअखेरीस मोठा झटका

Dec 07, 2022 03:40 PM IST Kulkarni Rutuja Sudeep

  • केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा धक्का. पेन्शन आणि पेन्शनर्स वेलफेअर विभागाने नवा नियम जारी केला आहे. नियम लागू झाल्यामुळे नवीन पेन्शन नियम कोणते आहेत? सविस्तर जाणून घ्या.

यापुढे कर्मचाऱ्यांना त्यांची पेन्शन एकदाच काढता येणार आहे. अहवालानुसार, जर एखाद्या कर्मचाऱ्याने त्याच्या मूळ वेतनाचा काही भाग पेन्शन खात्यातून काढला तर त्याला पुन्हा पेन्शन काढण्याची परवानगी दिली जाणार नाही.
twitterfacebookfacebook
share

(1 / 4)

सिव्हिल सर्व्हिसेस (कम्युटेशन ऑफ पेन्शन) नियम १९८१ नुसार, एकावेळी ४० टक्क्यांपेक्षा जास्त पेन्शन सरकारकडून काढता येणार नाही, निवृत्ती वेतन आणि निवृत्ती वेतनधारक कल्याण विभागाने यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे.
twitterfacebookfacebook
share

(2 / 4)

दरम्यान, सरकारी कागदपत्रांमध्ये एखाद्या व्यक्तीचे नाव नसले तरी तो कुटुंब निवृत्ती वेतनासाठी अर्ज करू शकतो. या पेन्शनचा दावेदार जोडीदार किंवा कायदेशीररित्या विभक्त झालेला जोडीदार असू शकतो. निवृत्तीवेतन आणि निवृत्ती वेतनधारक कल्याण विभागाने २६ ऑक्टोबर रोजी जारी केलेल्या कार्यालयीन निवेदनात ही माहिती दिली.
twitterfacebookfacebook
share

(3 / 4)

नियमांनुसार केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना फॉर्म ४ भरावा लागतो आणि कुटुंबातील सदस्यांची सर्व माहिती द्यावी लागते. जर कुटुंबातील एखाद्या सदस्याचा फॉर्म ४ मध्ये समावेश नसेल आणि एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याला कौटुंबिक पेन्शनचा दावा करायचा असेल तर तो आतापासून करू शकतो.
twitterfacebookfacebook
share

(4 / 4)

नियमांनुसार केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना फॉर्म ४ भरावा लागतो आणि कुटुंबातील सदस्यांची सर्व माहिती द्यावी लागते. जर कुटुंबातील एखाद्या सदस्याचा फॉर्म ४ मध्ये समावेश नसेल आणि एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याला कौटुंबिक पेन्शनचा दावा करायचा असेल तर तो आतापासून करू शकतो.

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज