मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  PHOTOS : उद्धव ठाकरेंचा हुकुमी एक्का तुरुंगाबाहेर; अंधेरीतील विजयानंतर शिवसेनेला दुसरा मोठा दिलासा

PHOTOS : उद्धव ठाकरेंचा हुकुमी एक्का तुरुंगाबाहेर; अंधेरीतील विजयानंतर शिवसेनेला दुसरा मोठा दिलासा

Nov 09, 2022 03:36 PM IST Atik Sikandar Shaikh
  • twitter
  • twitter

  • Sanjay Raut Bail : गेल्या १०० दिवसांपासून पत्राचाळ घोटाळा प्रकरणात तुरुंगात असलेले शिवसेना खासदार संजय राऊतांना पीएमएलए कोर्टानं जामीन मंजुर केला आहे.

Sanjay Raut Bail : शिवसेनेचे फायरब्रॅंड नेते खासदार संजय राऊतांना अखेर कोर्टानं जामीन मंजुर केला आहे. त्यामुळं आता अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीत विजय मिळवल्यानंतर शिवसेनेला हा दुसरा मोठा राजकीय दिलासा मिळाला आहे.
twitterfacebookfacebook
share

(1 / 10)

Sanjay Raut Bail : शिवसेनेचे फायरब्रॅंड नेते खासदार संजय राऊतांना अखेर कोर्टानं जामीन मंजुर केला आहे. त्यामुळं आता अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीत विजय मिळवल्यानंतर शिवसेनेला हा दुसरा मोठा राजकीय दिलासा मिळाला आहे.(HT_PRINT)

संजय राऊत हे पत्राचाळ घोटाळा प्रकरणात गेल्या तीन महिन्यांपासून तुरुंगात होते. त्यांना अनेकदा कोर्टानं जामीन नाकारला होता. आज त्यांना कोर्टानं जामीन मंजुर केल्यानं ईडीच्या वकिलांनी कोर्टाच्या निकालावर आक्षेप घेतला आहे.
twitterfacebookfacebook
share

(2 / 10)

संजय राऊत हे पत्राचाळ घोटाळा प्रकरणात गेल्या तीन महिन्यांपासून तुरुंगात होते. त्यांना अनेकदा कोर्टानं जामीन नाकारला होता. आज त्यांना कोर्टानं जामीन मंजुर केल्यानं ईडीच्या वकिलांनी कोर्टाच्या निकालावर आक्षेप घेतला आहे.(HT PHOTO)

संजय राऊतांना जामीन मिळाल्यानंतर त्यांच्या आई भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी त्यांनी 'माझा मुलगा परत येतोय, आनंद आहे', अशी प्रतिक्रिया दिली आहे.
twitterfacebookfacebook
share

(3 / 10)

संजय राऊतांना जामीन मिळाल्यानंतर त्यांच्या आई भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी त्यांनी 'माझा मुलगा परत येतोय, आनंद आहे', अशी प्रतिक्रिया दिली आहे.(HT_PRINT)

शनी हा देवांचा कायदामंत्री आणि गृहमंत्री आहे, त्यामुळं संजय राऊत यांना जामीन मिळावा, यासाठी मी विशेष पूजा केली होती, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे माजी खासदार आणि उपनेते चंद्रकांत खैरेंनी दिली आहे. याशिवाय आता जामीन मिळाल्यानंतर संजय राऊत हे कुटुंबियांसहित शनि-शिंगणापूरला येणार असल्याचंही ते म्हणाले.
twitterfacebookfacebook
share

(4 / 10)

शनी हा देवांचा कायदामंत्री आणि गृहमंत्री आहे, त्यामुळं संजय राऊत यांना जामीन मिळावा, यासाठी मी विशेष पूजा केली होती, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे माजी खासदार आणि उपनेते चंद्रकांत खैरेंनी दिली आहे. याशिवाय आता जामीन मिळाल्यानंतर संजय राऊत हे कुटुंबियांसहित शनि-शिंगणापूरला येणार असल्याचंही ते म्हणाले.(HT PHOTO)

संजय राऊतांना जामीन मिळाल्यानंतर शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी 'टायगर इज बॅक' अशी प्रतिक्रिया दिली आहे. याशिवाय याबाबत ते माध्यमांशी बोलत असताना त्यांना अश्रू अनावर झाल्याचंही पाहायला मिळालं.
twitterfacebookfacebook
share

(5 / 10)

संजय राऊतांना जामीन मिळाल्यानंतर शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी 'टायगर इज बॅक' अशी प्रतिक्रिया दिली आहे. याशिवाय याबाबत ते माध्यमांशी बोलत असताना त्यांना अश्रू अनावर झाल्याचंही पाहायला मिळालं.(PTI)

संजय राऊत हे निष्ठावंत आणि बाळासाहेबांचे खरे शिवसैनिक आहेत, त्यांच्यावरही अनेक प्रकारचं दबावतंत्र वापरण्यात आलं परंतु त्यांनी गद्दारी केली नाही, ते डरपोक नाहीत, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी राऊतांना जामीन मिळाल्यानंतर दिली आहे.
twitterfacebookfacebook
share

(6 / 10)

संजय राऊत हे निष्ठावंत आणि बाळासाहेबांचे खरे शिवसैनिक आहेत, त्यांच्यावरही अनेक प्रकारचं दबावतंत्र वापरण्यात आलं परंतु त्यांनी गद्दारी केली नाही, ते डरपोक नाहीत, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी राऊतांना जामीन मिळाल्यानंतर दिली आहे.(Sandip Mahankal)

संजय राऊतांना जामीन मिळाल्यानंतर जिल्हाप्रमुख संजय पवारांनी कोल्हापूरात आनंदोत्सव साजरा केला आहे. शिंदे-फडणवीसांना सुषमा अंधारेंनी 'सळो की पळो' करून सोडलं आहे. आता तर शिवसेनेचा वाघ बाहेर आल्याचं संजय पवार म्हणाले.
twitterfacebookfacebook
share

(7 / 10)

संजय राऊतांना जामीन मिळाल्यानंतर जिल्हाप्रमुख संजय पवारांनी कोल्हापूरात आनंदोत्सव साजरा केला आहे. शिंदे-फडणवीसांना सुषमा अंधारेंनी 'सळो की पळो' करून सोडलं आहे. आता तर शिवसेनेचा वाघ बाहेर आल्याचं संजय पवार म्हणाले.(PTI)

संजय राऊतांच्या जामीनानंतर, विरोधकांनी आता आपल्या राजकीय सतरंज्या संभाळाव्यात. आणि हो, कोंबड्यांनी आपली पिल्ले घेऊन आता खुराड्यात जाण्याची वेळ आली आहे, अशी प्रतिक्रिया विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी दिली आहे. याशिवाय त्यांनी वाघ पिंजऱ्यातून बाहेर येत असल्याचा हा फोटोही ट्वीट केला आहे.
twitterfacebookfacebook
share

(8 / 10)

संजय राऊतांच्या जामीनानंतर, विरोधकांनी आता आपल्या राजकीय सतरंज्या संभाळाव्यात. आणि हो, कोंबड्यांनी आपली पिल्ले घेऊन आता खुराड्यात जाण्याची वेळ आली आहे, अशी प्रतिक्रिया विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी दिली आहे. याशिवाय त्यांनी वाघ पिंजऱ्यातून बाहेर येत असल्याचा हा फोटोही ट्वीट केला आहे.(Ambadas Danve)

'सत्य परेशान हो सकता है पर पराजित नहीं', असं म्हणत शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांनी संजय राऊतांचा हा फोटो ट्वीट केला आहे.
twitterfacebookfacebook
share

(9 / 10)

'सत्य परेशान हो सकता है पर पराजित नहीं', असं म्हणत शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांनी संजय राऊतांचा हा फोटो ट्वीट केला आहे.(Kailas Patil)

संजय राऊतांना जामीन मिळाल्यानंतर त्यांचं राष्ट्रवादीनंही स्वागत केलं आहे. 'दोस्ती का दम, दिखा देंगे अब हम, वेलकम बॅक संजय राऊत', असं ट्वीट माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.
twitterfacebookfacebook
share

(10 / 10)

संजय राऊतांना जामीन मिळाल्यानंतर त्यांचं राष्ट्रवादीनंही स्वागत केलं आहे. 'दोस्ती का दम, दिखा देंगे अब हम, वेलकम बॅक संजय राऊत', असं ट्वीट माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.(Jitendra Awhad)

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज