मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  निद्रानाशाचा होता हृदयाच्या आरोग्यावर परिणाम, जाणून घ्या कसे हाताळावे

निद्रानाशाचा होता हृदयाच्या आरोग्यावर परिणाम, जाणून घ्या कसे हाताळावे

Apr 14, 2022 11:40 AM IST Hiral Gawande
  • twitter
  • twitter

निद्रानाशचा त्रास असेल तर त्याचा परिणाम थेट हृदयाच्या आरोग्यावर होत असतो. तुम्ही झोपेच्या चक्रातील समस्या कशा हाताळू शकतो आणि परिणामी हृदयविकाराचा धोका कसा कमी होतो, याविषयी डॉक्टरांनी मार्गदर्शन केले आहे.

विविध संशोधनांनुसार जगातील लोकसंख्येपैकी १० ते ३० टक्के लोक निद्रानाशाने ग्रस्त आहेत, ज्याचा हृदयविकाराच्या वाढत्या जोखमीशी देखील संबंध आहे. निद्रानाश किंवा खराब झोपेचे चक्र केवळ वर्तणुकीतील सतर्कता आणि लक्ष यावरच परिणाम करत नाही, तर तार्किक तर्क, साधी कार्ये करण्यात समस्या, अपघात आणि खराब निर्णय यावर देखील परिणाम करतात. जेव्हा ते तीव्र होते, तेव्हा यामुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी विकृती देखील होऊ शकते.
twitterfacebookfacebook
share

(1 / 12)

विविध संशोधनांनुसार जगातील लोकसंख्येपैकी १० ते ३० टक्के लोक निद्रानाशाने ग्रस्त आहेत, ज्याचा हृदयविकाराच्या वाढत्या जोखमीशी देखील संबंध आहे. निद्रानाश किंवा खराब झोपेचे चक्र केवळ वर्तणुकीतील सतर्कता आणि लक्ष यावरच परिणाम करत नाही, तर तार्किक तर्क, साधी कार्ये करण्यात समस्या, अपघात आणि खराब निर्णय यावर देखील परिणाम करतात. जेव्हा ते तीव्र होते, तेव्हा यामुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी विकृती देखील होऊ शकते.(Photo by Victoria Heath on Unsplash)

यूके मधील बायोबँक प्रॉस्पेक्टिव्ह कोहॉर्ट स्टडीने ४० ते ६९ वयोगटातील पाच लाख प्रौढांना झोपेचा विकार असलेल्यांचे विश्लेषण केले. यामध्ये ५ तासांपेक्षा कमी झोपेचा कालावधी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपेचा कालावधी असलेल्या व्यक्तींमध्ये हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी विकृती आणि मृत्यूचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून आले. इतर अभ्यासांनी हे देखील सिद्ध केले आहे की, खंडित आणि अडथळा आणणारी झोप उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, टाइप २ मधुमेहाशी संबंधित आहे, ज्यामुळे हार्ट डिसीज, स्ट्रोक आणि हार्ट अटॅकचा धोका वाढू शकतो.
twitterfacebookfacebook
share

(2 / 12)

यूके मधील बायोबँक प्रॉस्पेक्टिव्ह कोहॉर्ट स्टडीने ४० ते ६९ वयोगटातील पाच लाख प्रौढांना झोपेचा विकार असलेल्यांचे विश्लेषण केले. यामध्ये ५ तासांपेक्षा कमी झोपेचा कालावधी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपेचा कालावधी असलेल्या व्यक्तींमध्ये हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी विकृती आणि मृत्यूचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून आले. इतर अभ्यासांनी हे देखील सिद्ध केले आहे की, खंडित आणि अडथळा आणणारी झोप उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, टाइप २ मधुमेहाशी संबंधित आहे, ज्यामुळे हार्ट डिसीज, स्ट्रोक आणि हार्ट अटॅकचा धोका वाढू शकतो.(Pixabay)

मुंबईच्या एशियन हार्ट इन्स्टिट्यूटचे वरिष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ. संतोष कुमार डोरा यांनी जरफशान शिराझ यांना दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, "निद्रानाश असलेल्या व्यक्तींमध्ये इंफ्लामेटरी साइटोकाइन्सची उच्च रक्त पातळी आढळते आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी विकृती आणि मृत्यूचे कारण असल्याचे मानले जाते. कालांतराने सतत झोपेच्या कमतरतेच्या समस्यांमुळे अस्वस्थ सवयी निर्माण होऊ शकतात. ज्याचा परिणाम उच्च ताण पातळी, कमी ऊर्जा, कमी शारीरिक अॅक्टिव्हीटी आणि अनहेल्दी फूड चॉइस या सर्व हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगासाठी जोखीम घटक आहेत."
twitterfacebookfacebook
share

(3 / 12)

मुंबईच्या एशियन हार्ट इन्स्टिट्यूटचे वरिष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ. संतोष कुमार डोरा यांनी जरफशान शिराझ यांना दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, "निद्रानाश असलेल्या व्यक्तींमध्ये इंफ्लामेटरी साइटोकाइन्सची उच्च रक्त पातळी आढळते आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी विकृती आणि मृत्यूचे कारण असल्याचे मानले जाते. कालांतराने सतत झोपेच्या कमतरतेच्या समस्यांमुळे अस्वस्थ सवयी निर्माण होऊ शकतात. ज्याचा परिणाम उच्च ताण पातळी, कमी ऊर्जा, कमी शारीरिक अॅक्टिव्हीटी आणि अनहेल्दी फूड चॉइस या सर्व हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगासाठी जोखीम घटक आहेत."(Photo by Mert Kahveci on Unsplash)

ते टाळण्यासाठी, निरोगी झोपेची सवय, ज्यामुळे ७ ते ९ तासांची चांगली झोप लागते हे निरोगी हृदयासाठी अतिशय गरजेचे आहे. डॉ संतोष कुमार डोरा यांनी आपण झोपेच्या चक्रातील समस्या कशा हाताळू शकतो आणि परिणामी हृदयविकाराचा धोका कसा कमी करू शकतो याचे मार्ग सांगितले आहेत.
twitterfacebookfacebook
share

(4 / 12)

ते टाळण्यासाठी, निरोगी झोपेची सवय, ज्यामुळे ७ ते ९ तासांची चांगली झोप लागते हे निरोगी हृदयासाठी अतिशय गरजेचे आहे. डॉ संतोष कुमार डोरा यांनी आपण झोपेच्या चक्रातील समस्या कशा हाताळू शकतो आणि परिणामी हृदयविकाराचा धोका कसा कमी करू शकतो याचे मार्ग सांगितले आहेत.(Pixabay)

१. कॅफिन टाळा- झोपेच्या किमान ६ तास आधी कॅफिन किंवा कार्बोनेटेड पेये न पिण्याचा प्रयत्न करा.
twitterfacebookfacebook
share

(5 / 12)

१. कॅफिन टाळा- झोपेच्या किमान ६ तास आधी कॅफिन किंवा कार्बोनेटेड पेये न पिण्याचा प्रयत्न करा.(Unsplash)

२. स्क्रीन टाइम- झोपण्यापूर्वी तुमचा स्क्रीन टाइम कमी करा. तुमच्या पलंगाच्या आजूबाजूला कोणतेही गॅझेट ठेवणे टाळा. जेणेकरून त्याचा झोपेच्या गुणवत्तेवर परिणाम होणार नाही.
twitterfacebookfacebook
share

(6 / 12)

२. स्क्रीन टाइम- झोपण्यापूर्वी तुमचा स्क्रीन टाइम कमी करा. तुमच्या पलंगाच्या आजूबाजूला कोणतेही गॅझेट ठेवणे टाळा. जेणेकरून त्याचा झोपेच्या गुणवत्तेवर परिणाम होणार नाही.(Getty Images)

३. धूम्रपान आणि मद्यपान करू नका - तुमच्या दैनंदिन जीवनात धूम्रपान आणि मद्यपान टाळा.
twitterfacebookfacebook
share

(7 / 12)

३. धूम्रपान आणि मद्यपान करू नका - तुमच्या दैनंदिन जीवनात धूम्रपान आणि मद्यपान टाळा.(Pexels)

४. हेल्दी अन्न खा - पॅकबंद पदार्थांऐवजी, हेल्दी अन्न पर्याय वापरण्याचा प्रयत्न करा. उपाशीपोटी किंवा पोटभर झोपू नका.
twitterfacebookfacebook
share

(8 / 12)

४. हेल्दी अन्न खा - पॅकबंद पदार्थांऐवजी, हेल्दी अन्न पर्याय वापरण्याचा प्रयत्न करा. उपाशीपोटी किंवा पोटभर झोपू नका.(Shutterstock)

५. ध्यान करा- ध्यानाच्या मदतीने मन शांत करा. हे तुमच्या रोजची सकाळ किंवा संध्याकाळची अॅक्टिव्हीटी होऊ शकते.
twitterfacebookfacebook
share

(9 / 12)

५. ध्यान करा- ध्यानाच्या मदतीने मन शांत करा. हे तुमच्या रोजची सकाळ किंवा संध्याकाळची अॅक्टिव्हीटी होऊ शकते.(Pexels)

६. पुस्तके वाचा- जर तुम्हाला अंथरुणावर २० मिनिटांनंतर झोप येत नसेल, तर तुमचे मन शांत होईल असे काहीतरी वाचण्याचा प्रयत्न करा. हे तुम्हाला चांगली झोप घेण्यास मदत करेल.
twitterfacebookfacebook
share

(10 / 12)

६. पुस्तके वाचा- जर तुम्हाला अंथरुणावर २० मिनिटांनंतर झोप येत नसेल, तर तुमचे मन शांत होईल असे काहीतरी वाचण्याचा प्रयत्न करा. हे तुम्हाला चांगली झोप घेण्यास मदत करेल.(Representative Image/HT File)

७. तुमच्या बेडरूममध्ये इंव्हेस्ट करा- तुमच्या बेडरूमला आरामदायी जागा बनवण्याचा प्रयत्न करा. चांगल्या दर्जाच्या फोम मॅट्रेसमध्ये गुंतवणूक करा.
twitterfacebookfacebook
share

(11 / 12)

७. तुमच्या बेडरूममध्ये इंव्हेस्ट करा- तुमच्या बेडरूमला आरामदायी जागा बनवण्याचा प्रयत्न करा. चांगल्या दर्जाच्या फोम मॅट्रेसमध्ये गुंतवणूक करा.(File Photo)

८. डॉक्टरांचा सल्ला घ्या - जर तुम्हाला झोपेच्या तीव्र समस्या असतील तर ते निरोगी सवयींद्वारे मॅनेज केले जाऊ शकतात. पण जर दीर्घकालीन समस्या कायम राहिल्या तर, डॉक्टरांना भेट देणे आणि त्यानुसार थेरपी किंवा औषधे घेणे महत्वाचे आहे. स्वत: चा औषधोपचार करू नका. कारण त्यामुळे तुमच्या झोपेचा धोका तसेच हृदयाच्या समस्या वाढू शकतात.
twitterfacebookfacebook
share

(12 / 12)

८. डॉक्टरांचा सल्ला घ्या - जर तुम्हाला झोपेच्या तीव्र समस्या असतील तर ते निरोगी सवयींद्वारे मॅनेज केले जाऊ शकतात. पण जर दीर्घकालीन समस्या कायम राहिल्या तर, डॉक्टरांना भेट देणे आणि त्यानुसार थेरपी किंवा औषधे घेणे महत्वाचे आहे. स्वत: चा औषधोपचार करू नका. कारण त्यामुळे तुमच्या झोपेचा धोका तसेच हृदयाच्या समस्या वाढू शकतात.(Twitter/Cancer_Buzz)

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज