बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२२ मध्ये टीम इंडियाने चांगली कामगिरी करणे सुरूच ठेवले आहे. रविवारचा दिवसही टीम इंडियासाठी चांगला ठरला. १९ वर्षीय जेरेमी लालरिनुंगाने वेटलिफ्टिंगमध्ये टीम इंडियासाठी सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला.
मिझोरामहून आलेला जेरेमी लालनिरुंगा राष्ट्रकुलमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचा हिरो ठरला आहे. सर्वजण त्याचे कौतुक करत आहेत. तसेच, प्रत्येकाला जेरेमीबद्दल जाणून घ्यायची इच्छा झाली आहे,
जेरेमी लालरिनुंगा हा स्टार फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोचा चाहता आहे. जेव्हा त्याला एका मुलाखतीत विचारण्यात आले की त्याचा आवडता खेळाडू कोण आहे. प्रत्युत्तरात तो म्हणाला की, माझे वडील माझे स्टार आहेत, पण मला स्टार फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोही जास्त आवडतो.
जेरेमीचे वडील हे देखील राष्ट्रीय स्तरावरील बॉक्सर आहेत. त्यांच्यापासून प्रभावित होऊन जेरेमीनेही बॉक्सिंगला सुरुवात केली. जेरेमी सतत रिंगमध्ये उतरायचा, पण नंतर त्याने वेटलिफ्टिंगमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला.
१९ वर्षीय जेरेमी लालरिनुंगा इंस्टाग्रामवर देखील खूप सक्रिय आहे. त्याचे फॅन फॉलोइंग देखील प्रचंड आहे, तो सतत त्याचे अनेक फोटो पोस्ट करत असतो.
जेरेमी लालरिनुंगाची फोटो पाहून अनेक चाहत्यांनी असेही म्हटले आहे की, तो संपूर्ण मॉडेलसारखाच आहे.
जेरेमीने इंस्टाग्रामवर अनेक रील्सही शेअर केल्या आहेत, त्याला ते खूप आवडते. जेरेमीने वेटलिफ्टिंग करतानाचे अनेक व्हिडिओ शेअर केले आहेत ज्यात लेटेस्ट गाण्यांचा समावेश आहे त्याने अनेक ट्रेंडिंग रील्स देखील बनवले आहेत.
यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत आपण सुवर्ण पदक जिंकणारच, असे जेरेमीने ठरवले होते. तसेच, त्याने राष्ट्रकुलमधल्या सुवर्ण पदकाचा फोटो मोबाईलवर वॉलपेपर म्हणून ठेवला होता, तो फोटो त्याने पोस्ट देखील केला होता. आता त्याने खरंच सुवर्ण पदक जिंकले आहे.