यानिमित्ताने दीपिकाने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर एक रोमँटिक फोटो शेअर केला आहे. यामध्ये दिनेश कार्तिकने दीपिकाला मिठी मारली आहे. दीपिकाने त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले - आमच्या आनंदाची सात वर्षे. दिनेशनेही त्याच्या इंस्टाग्राम हँडलवरही एक इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे.
दीपिका आणि दिनेश कार्तिक यांची भेट २०१३ मध्ये झाली होती. दोघांनी दोन वर्षे एकमेकांना डेट केले आणि २०१५ मध्ये लग्न केले. वास्तविक, दोन दिवसांपूर्वी म्हणजेच गुरुवारी दिनेशने दीपिकाला तिच्या सातव्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छाही दिल्या होत्या. त्याचवेळी, आज शनिवारी दीपिकाने दिनेशचे शुभेच्छा दिल्या आहे.
दिनेश आणि दीपिकाने वेगवेगळ्या रितीरिवाजानुसार दोनदा लग्न केले होते. १८ ऑगस्टला दोघांनी ख्रिश्चन रितीरिवाजांनुसार लग्न केले होते.
तर २० ऑगस्टला हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न केलं. त्यामुळे दोघांनी एकमेकांना वेगवेगळ्या दिवसांच्या शुभेच्छा दिल्या.
दिनेश कार्तिकचे हे दुसरे लग्न आहे. याआधी २००७ मध्ये त्याने त्याची बालपणीची मैत्रीण निकिता हिच्याशी लग्न केले होते. मात्र, दिनेश आणि निकिता यांचा २०१२ मध्ये घटस्फोट झाला. नंतर निकिताने मुरली विजय या भारतीय खेळाडूशी दुसरे लग्न केले. त्याचवेळी दिनेशने दीपिकाशी लग्न केले.
गेल्या वर्षी दिनेश कार्तिक जुळ्या मुलांचा बाप झाला. दिनेशने सोशल मीडियावर मुलांसोबतचा एक फोटो शेअर केला होता.
दिनेश आणि दीपिकाने आपल्या मुलांचे नाव खूप खास ठेवले आहे. एकाचे नाव कबीर पल्लीकल कार्तिक आणि दुसऱ्याचे नाव जियान पल्लीकल.
दिनेश २०१२ साली भारतीय संघातून बाहेर पडला होता. त्यानंतर त्याने कॉमेंट्री करण्यास सुरुवात केली होती. मात्र, यंदा आयपीएलमध्ये दिनेशने जबरदस्त कामगिरी केली. यानंतर, भारतीय निवडकर्त्यांनी त्याला फिनिशर म्हणून यंदाच्या T20 आशिया चषकात संघात स्थान दिले आहे. कार्तिक तीन वर्षांनी भारतीय संघात परतला. याआधी तो २०१९ विश्वचषकात टीम इंडियाचा भाग होता.
त्याचबरोबर नुकत्याच पार पडलेल्या बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्समध्ये दीपिका पल्लीकलने जबरदस्त कामगिरी केली आहे. तिने सौरव घोषालसह स्क्वॉशच्या मिश्र दुहेरीत कांस्यपदक जिंकले. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (CWG) हे दीपिकाचे हे एकूण चौथे पदक होते.
दीपिकाने यापूर्वी २०१४ ग्लासगो CWG मध्ये सुवर्ण (महिला दुहेरी), २०१८ गोल्ड कोस्ट CWG मध्ये दोन रौप्य (महिला दुहेरी आणि मिश्र दुहेरी) जिंकले आहेत. याशिवाय तिने आशियाई क्रीडा स्पर्धेत एक रौप्य (२०१४ ) आणि तीन कांस्य (२०१०, २०१४, २०१८) पदके जिंकली आहेत.