(2 / 13)मेषः आज साध्य योगात घरात शुभकार्य घडतील. व्यवसायात कुणी नवीन भागीदार जोडण्याचा विचार कराल. जादा भांडवलाची गरज वाटेल. नोकरीत नेहमीच्या पद्धतीने काम न झाल्याने कामाची पद्धत बदलावी लागेल. तुमचे विचार घरातील व्यक्तींच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न कराल. विद्यार्थ्यांनी मनात शंका ठेवू नये. बौद्धिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तीस प्रकाशन साहित्यिक यांच्या करिता आनंदी दिवस आहे. मन प्रसन्न राहील. नवनवीन कल्पना सुचतील. आणि त्या आमलातही आणाल. त्यातून आर्थिक स्तोत्र वाढेल. मनातील संभ्रम दुर ठेवा. दाम्पत्य जीवन सुखी राहील. विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणाची संधी मिळू शकते. नवीन व्यापार कामकाजास प्रारंभ करण्यासाठी उत्तम दिवस आहे. आरोग्य उत्तम राहील. नवीन घर वाहन खरेदीस अनुकूल दिवस आहे. शुभरंगः तांबूस शुभदिशाः दक्षिण.शुभअंकः ०४, ०९.