गेल्या दोन तीन दशकांपासून बॉलिवूड अभिनेते हे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. आता या कलाकारांनी जवळपास ५०शी पार केली आहे. आता हे कलाकार तरुणपणी कसे दिसतात हे आजच्या तरुणपिढीला नेहमी पाहायचे असते. चला पाहूया बॉलिवूडमधील काही सुपरस्टार अभिनेते तरुणपणी कसे दिसायचे…
बॉलिवूडचा खलनायक म्हणूण संजू बाबा ओळखला जातो. त्याची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळते. त्याच्या तरुणपणीचा हा फोटो आहे.
बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणून अभिनेता अक्षय कुमार ओळखला जातो. आता त्याचा तरुणपणीचा फोटो समोर आला आहे. अक्षय आजही या वयात अनेक खतरनाक स्टंट देखील करताना दिसतो.
बॉलिवूडचा किंग खान शाहरुने संपूर्ण जगावर राज्य केले आहे. त्याच्या चाहता वर्ग सातासमुद्रापार पाहायला मिळतो. त्याने वयाची ५०शी ओलांडल्यानंतरही अतिशय फिट आणि फाईन दिसतो. त्याचा तरुणपणीचा एक फोटो व्हायरल झाला आहे.
अभिनेता सलमान खान कायमच चर्चेत असतो. तरुणांच्या मनावर तो अधिराज्य गाजवताना दिसतो. नुकताच त्याचा तरुणपणीचा फोटो समोर आला आहे.
अभिनेता सैफ अली खानचा तरुणपणीचा फोटो नेहमीच सर्वांचे लक्ष वेधून घेतो. त्याचा मुलगा इब्राहिम देखील त्याच्यासारखाच दिसत असल्याचा हा पुरावा आहे.
या वयातही अतिशय फिट असणाऱ्या अनिल कपूरचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.