(2 / 5)'टिप्सी' या चित्रपटामध्ये एका मद्यधुंद मुलींची कथा दाखवण्यात आली आहे. पूजा भट्टने या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचच्या वेळी दारूबद्दल बोलताना म्हटले की, 'मी या मंचावर उभी आहे आणि मी न डगमगता सांगू शकते की, मी एकेकाळी मद्यपी होते, मी गेल्या साडे सात वर्षांपासून दारूला हात लावलेला नाही. दारू पिणे आणि नंतर दारू सोडणे ही केवळ पुरुषाची मक्तेदारी नसून, ती महिलांचीही सवय असू शकते. हेच यातून दिसून येते.