महात्मा फुले जयंतीनिमित्ताने पुण्यात शिजली दहा हजार किलोंची ‘भव्य एकता मिसळ’; नेते मंडळींनी मारला ताव!
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  महात्मा फुले जयंतीनिमित्ताने पुण्यात शिजली दहा हजार किलोंची ‘भव्य एकता मिसळ’; नेते मंडळींनी मारला ताव!

महात्मा फुले जयंतीनिमित्ताने पुण्यात शिजली दहा हजार किलोंची ‘भव्य एकता मिसळ’; नेते मंडळींनी मारला ताव!

महात्मा फुले जयंतीनिमित्ताने पुण्यात शिजली दहा हजार किलोंची ‘भव्य एकता मिसळ’; नेते मंडळींनी मारला ताव!

Apr 11, 2024 03:49 PM IST
  • twitter
  • twitter
Mahatma Phule Jayanti 2024 Ekta Misal Pune:  क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती यांच्या वतीने ‘भव्य एकता मिसळ’चे आयोजन करण्यात आले होते.
क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती यांच्या वतीने ‘भव्य एकता मिसळ’चे आयोजन करण्यात आले होते. अयोध्येत विश्वविक्रमी शिरा बनवण्यासाठी वापरलेली भव्य कढई पहिल्यांदाच मिसळ करण्याकरिता पुण्यात आणण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शेफ विष्णू मनोहर यांनी यात मिसळ शिजवली आहे.
twitterfacebook
share
(1 / 5)

पुण्यात आणण्यात आलेल्या तब्बल १५ बाय १५ फूट आणि ६.५ फूट उंच अशा २५०० किलो वजनाच्या या भव्य कढईमध्ये १० हजार किलो मिसळ तयार करण्यात आली. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती यांच्या वतीने महात्मा फुले यांच्या जयंतीदिनी हा उपक्रम गंज पेठेतील महात्मा ज्योतिबा फुले वाडा येथे आयोजित करण्यात आला होता.
twitterfacebook
share
(2 / 5)

अयोध्येत तब्बल ७ हजार किलोचा विश्वविक्रमी शिरा साकारण्याकरिता वापरलेल्या या भव्य कढईत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शेफ विष्णू मनोहर यांनी ही १० हजार किलो मिसळ तयार केली आहे. या उपक्रमामध्ये १० हजार किलो मिसळ बनवण्यासाठी १००० किलो मटकी, ८०० किलो कांदा, २०० किलो आलं, २०० किलो लसूण, ७०० किलो तेल, १४० किलो मिसळ मसाला, ४० किलो लाल मिरची पावडर, ४० किलो हळद पावडर, ५० किलो मीठ, १४० किलो खोबरा कीस, ७ किलो तमाल पत्र, २५०० किलो फरसाण, १०००० लिटर पाणी, १२५ जुडी कोथिंबीर, १००० लिंबू, १.५ लाख स्लाईड ब्रेड इत्यादी साहित्य वापरण्यात आले.
twitterfacebook
share
(3 / 5)

पुणेकरांनी कोणताही नव्याने सुरू केलेला उपक्रम हा समाजातील इतरांकरीता आदर्श ठरत असतो. त्यामुळेच यंदा सलग दुसऱ्या वर्षी आगळ्या-वेगळ्या पद्धतीने लोकसहभागातून एकूण २० हजार किलो मिसळ तयार करण्याचा उपक्रम घेण्यात आला होता. लोकसहभाग असला की, कितीही मोठी अवघड गोष्ट ही अगदी सहज मार्गी लागते, अशी हजारो उदाहरणे स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते आजपर्यंत या समाजात पहायला मिळतात. याच धर्तीवर लोकसहभागासाठी लोकांनी एकत्र येण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन केले होते.
twitterfacebook
share
(4 / 5)

यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, मुरलीधर मोहोळ, बाळासाहेब शिवरकर यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या उपक्रमाला भेट देत एकत्रितपणे मिसळीचा आस्वादही घेतला. प्रल्हाद गवळी, श्रीधर चव्हाण, नंदा पंडित, सारंग सराफ, रवी चौधरी, सुशीला नेटके, विजय रजपूत, एकनाथ ढोले, बाळासाहेब अमराळे, सुनीता काळे, संतोष पंडित, पीयूष शहा, रुपेश चांदेकर, महेंद्र मारणे आदींनी  आयोजनात सहभाग घेतला.
twitterfacebook
share
(5 / 5)

इतर गॅलरीज