मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Ludhiana Crime : सफाईसाठी आत गेली अन् एटीएमचं शटर कोसळलं; अधिकाऱ्यांनी दरवाजा तोडून महिलेला वाचवलं

Ludhiana Crime : सफाईसाठी आत गेली अन् एटीएमचं शटर कोसळलं; अधिकाऱ्यांनी दरवाजा तोडून महिलेला वाचवलं

Feb 14, 2023 04:29 PM IST

Ludhiana Crime News Marathi : एटीएममध्ये सफाईसाठी गेलेल्या एका महिसोबत भयंकर प्रकार घडल्याची घटना समोर आली आहे.

Ludhiana Punjab Crime News Marathi
Ludhiana Punjab Crime News Marathi (HT)

Ludhiana Punjab Crime News Marathi : एटीएमची सफाई करण्यासाठी आत गेल्यानंतर अचानक शटर खाली कोसळल्यानं महिलेला तब्बल दोन तास एटीएममध्येच अडकून रहावं लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पंजाबमधील लुधियाना शहरात ही संताजनक घटना घडली असून त्यानंतर बँक अधिकाऱ्यांना गॅस कटरच्या सहाय्यानं शटर कापून महिलेचा जीव वाचवण्यात यश आलं आहे. त्यामुळं दोन तासांपासून मृत्यूच्या दाढेस फसलेल्या महिलेनं बाहेर आल्यानंतर मोकळा श्वास घेतला. त्यानंतर महिलेनं बँकेतील अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी केली आहे. या थरारक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहून अनेकांनी धक्कादायक घटनेबाबत आश्चर्य व्यक्त केलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मिळालेल्या माहितीनुसार, पंजाबच्या लुधियाना शहरातील डीसी ऑफिससमोरील एका एटीएमची सफाई करण्यासाठी महिला आत गेली होती. परंतु ती आत जाताच एटीएमचं शटर खाली कोसळलं. त्यानंतर महिलेनं जीवाच्या आकांतानं आरडाओरड करायला सुरुवात केली. परंतु बाहेर कुणालाही आवाज जात नव्हता. अखेरीस प्रचंड घाबरलेल्या सफाई कामगार महिलेनं शटरवर जोरजोरात ठोसे मारायला सुरुवात केली. त्यानंतर एटीएममध्ये कुणीतरी फसल्याचं लक्षात येताच स्थानिकांसह संबंधित बँक कर्मचाऱ्यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत महिलेला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

सुरुवातीला उपस्थित स्थानिकांसह बँकेच्या कर्मचाऱ्यांनी शटर खोलण्याचा आटोकाट प्रयत्न केला. परंतु कोसळलेलं शटर काही ओपन होत नव्हतं. अखेरीस बँक कर्मचाऱ्यांनी एका फिटरला बोलावून गॅस कटरने एटीएमचं शटर तोडून महिलेचा जीव वाचवला. त्यानंतर दोन तासांपासून मृत्यूच्या दारात असलेली महिला बाहेर येताच तिनं बँकेच्या अधिकाऱ्यांना चांगलंच सुनावलं. बँक प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळं माझा जीव गेला असता, असं म्हणत महिलेनं संताप व्यक्त केला आहे. परंतु या प्रकरणावर बँकेच्या कोणत्याही अधिकाऱ्यानं अधिक बोलणं टाळलं आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४