मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Kiss Day 2023 : व्हॅलेंटाईन्सला किसिंग केल्यास जोडप्यांना होणार अटक; भारतातील कायदा काय सांगतो?

Kiss Day 2023 : व्हॅलेंटाईन्सला किसिंग केल्यास जोडप्यांना होणार अटक; भारतातील कायदा काय सांगतो?

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Feb 13, 2023 05:56 PM IST

Kiss Day 2023 : आज भारतासह संपूर्ण जगभरात किस डे साजरा केला जात आहे. उद्या व्हॅलेंटाईन डे साजरा केला जाणार असल्यामुळं त्यासंदर्भातील कायदे काय आहेत, वाचा!

Kiss Day 2023
Kiss Day 2023 (REUTERS)

Valentine Week 2023 : भारतासह संपूर्ण जगभरात आज किसिंग डे साजरा केला जात आहे. अनेक तरुण आपल्या गर्लफ्रेंडला किस करून प्रेम व्यक्त करत असतात. १४ फ्रेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे साजरा केला जाणार असल्यामुळं या प्रेमाच्या महिन्यात अनेक जोडपे एकमेकांसोबत वेळ घालवत असतात. परंतु व्हॅलेंटाईन वीकमध्ये अनेक जोडप्यांना सार्वजनिक ठिकाणी किस केल्यामुळं अटक होऊ शकते. केवळ भारतातच नाही तर अनेक देशांमध्ये अशा प्रकारचे कायदे करण्यात आलेले असल्यामुळं जर तुम्ही व्हॅलेंटाईन डे साजरा करणार असाल तर अधिकची काळजी घेण्याची गरज आहे.

भारतातील नियम काय आहेत?

भारतातील अनेक राज्यांमध्ये सार्वजनिक ठिकाणी किसिंग करणं हा गुन्हा मानला जातो. एखादं जोडपं सार्वजनिक ठिकाणी किस करत असेल तर त्यांना अश्लिल कृत्य करण्याच्या आरोपाखाली पोलीस अटक करू शकतात. त्यासाठी घटनेत २९४ कलमाचा वापर केला जाऊ शकतो. केवळ अटकच नाही तर जोडप्यांविरोधात पोलीस गुन्हाही दाखल करू शकतात. त्यामुळं आता तुम्ही व्हॅलेंटाईन्स डे किंवा किसिंग डे च्या निमित्तानं गर्लफ्रेंड अथवा बॉयफ्रेंडला सार्वजनिक ठिकाणी किसिंग करत असाल तर तो गुन्हा मानला जाणार आहे.

केवळ भारतच नाही तर खाडीच्या देशांमध्येही किसिंग करणं हा गुन्हा मानला जातो. सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, इंडोनेशिया, इराण आणि कतार या देशांमध्ये सार्वजनिक ठिकाणी चुंबन घेणं कायदेशीर गुन्हा मानला जातो. या गुन्ह्याखाली अटक करण्यात आलेल्या जोडप्यांना कारावास किंवा दंड करण्याचंही प्रावधान या देशांच्या घटनेत आहे.

IPL_Entry_Point