मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Kiss Day ची आतुरतेने वाट पाहतात कपल्स! किस करण्याचे आहेत अनेक आरोग्यदायी फायदे!

Kiss Day ची आतुरतेने वाट पाहतात कपल्स! किस करण्याचे आहेत अनेक आरोग्यदायी फायदे!

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Feb 12, 2023 04:06 PM IST

Valentines Week 2023: किस केल्याने नात्यात प्रेम आणि आपुलकी तर वाढतेच पण त्याचबरोबर काही आरोग्यदायी फायदेही होतात.

Kiss Day 2023
Kiss Day 2023 (Freepik )

Relationship: प्रेमाचा आठवडा म्हणजेच व्हॅलेंटाईन वीक (Kiss Day 2023) सुरू आहे. व्हॅलेंटाईन वीक दरम्यान, प्रेमळ जोडपे त्यांच्या जोडीदारांना वेगवेगळ्या प्रकारे प्रभावित करण्याचा प्रयत्न करतात. ते एकमेकांची स्तुती करतात आणि गुलाबाचे फूल, चॉकलेट, सॉफ्ट टॉय अशा अनेक प्रकारच्या भेटवस्तू देतात . या आठवड्याची सुरुवात रोज डेने होते, त्यानंतर प्रपोज डे, चॉकलेट डे, टेडी डे, प्रॉमिस डे, हग डे, किस डे आणि नंतर व्हॅलेंटाइन डे येतो. पण या सगळ्या दिवसात प्रत्येक कपल किस डेची आतुरतेने वाट पाहत असतो. यंदा हा डे १३ फेब्रुवारीला साजरा केला जाणार आहे. किस म्हणजे चुंबन हे भावना व्यक्त करण्याचे एक सुंदर माध्यम आहे. किस केल्याने नात्यात प्रेम आणि आपुलकी तर वाढतेच पण त्याचबरोबर काही आरोग्यदायी फायदेही होतात.

किस आरोग्यासाठी फायदेशीर कोणते आहेत?

किस केल्याने अनेक प्रकारच्या शारीरिक समस्या कमी होऊ शकतात. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, किस करताना चेहऱ्याचे ३४ चेहऱ्याचे स्नायू आणि शरीरातील ११२ मुद्रा स्नायू सक्रिय होतात. यामुळे स्नायू घट्ट व टोन्ड राहतात. किस केल्याने चेहऱ्यातील रक्ताभिसरण वेगाने वाढते, ज्यामुळे त्वचा तरूण आणि सुंदर दिसते. किस वृद्धत्व टाळण्यासाठी आणि शारीरिक समस्या दूर करण्यासाठी कार्य करते.

किस केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते

किस रोगप्रतिकारक शक्ती वाढते. २०१४ मध्ये मायक्रोबायोम जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यास अहवालानुसार, ओठांवर किस करताना जोडप्याची लाळ एकमेकांना हस्तांतरित केली जाते. लाळेमध्ये काही सूक्ष्म जंतू असतात, ज्यांच्या संपर्कात आल्यावर रोगप्रतिकारक यंत्रणा त्यांच्या विरुद्ध प्रतिपिंड तयार करू लागते. चुंबनामुळे हे जंतू शरीरात पोहोचल्याने भविष्यातील आजाराचा धोका कमी होतो.

किस केल्याने तणाव कमी करतात

किसमुळे नैराश्य आणि तणावही कमी होतो. कॉर्टिसॉल या संप्रेरकामुळे मानवांमध्ये तणाव वाढतो. पण जेव्हा लोक एकमेकांना किस करतात, मिठी मारतात किंवा प्रेम व्यक्त करतात तेव्हा मेंदूतील कोर्टिसोलची पातळी कमी होऊ लागते. यामुळे ऑक्सिटोसिन हार्मोन्स बाहेर पडतात, ज्यामुळे तणाव कमी होतो. सोप्या शब्दात, चुंबन मूड फ्रेश करते. अस्वस्थता आणि निद्रानाशासह चिंता कमी होऊ लागते.

किस केल्याने उच्च रक्तदाबाच्या तक्रारी कमी होतात

ज्यांना उच्च रक्तदाबाची तक्रार आहे त्यांच्यासाठी किस एक प्रभावी उपचार आहे. चुंबन तज्ञ आणि लेखिका एंड्रिया डिमर्जियान म्हणतात की जेव्हा लोक किस घेतात तेव्हा त्यांच्या हृदयाची गती वाढू लागते. यामुळे रक्तवाहिन्या रुंद होतात आणि रक्तप्रवाह चांगला होतो, त्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो.

कोलेस्ट्रॉल कमी करते

किस सीरम कोलेस्टेरॉलची पातळी देखील कमी करू शकते. हृदयरोग आणि पक्षाघाताचा धोका दूर करण्यासाठी किस फायदेशीर आहे.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग