मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  तळीरामांनी अर्थव्यस्थेला तारलं; भारतात व्हिस्की पिणाऱ्यांची संख्या वाढली, फ्रान्सलाही टाकलं मागे

तळीरामांनी अर्थव्यस्थेला तारलं; भारतात व्हिस्की पिणाऱ्यांची संख्या वाढली, फ्रान्सलाही टाकलं मागे

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Feb 13, 2023 04:57 PM IST

Whisky Import In India : राहणीमानाचा दर्जा सुधारल्यामुळं अनेक लोक महागडी दारू पिण्यास प्राधान्य देत आहेत. त्यामुळं आता भारतात व्हिस्कीची आयात तब्बल ६० टक्क्यांनी वाढल्याची माहिती समोर आली आहे.

Whisky Import In India
Whisky Import In India (HT)

Whisky Import In India : कोरोना महामारीमुळं महाराष्ट्रासह देशाची अर्थव्यवस्था संकटात सापडल्यानंतर अनेक सरकारांनी देशी दारुसह विदेशी दारुची विक्री सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता गेल्या वर्षभरापासून जनजीवन सुरळीत झाल्यानं अनेक लोकांच्या राहणीमानाचा दर्जा सुधारत आहे. त्यानंतर आता गेल्या वर्षभरात भारतातील व्हिस्कीची आयात तब्बल ६० टक्क्यांनी वाढल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळं आता फ्रान्सला मागे टाकत भारत हा व्हिस्कीची सर्वात जास्त खरेदी करणारा देश ठरला आहे. स्कॉटलंडमधील एका कंपनीनं केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे.

भारतात गेल्या वर्षी स्कॉच व्हिस्कीच्या ७०० एमएलच्या २१.०९ कोटी आणि फ्रान्समध्ये २०.०५ कोटी बाटल्यांची आयात करण्यात आली आहे. त्यामुळं गेल्या दहा वर्षांत भारतीयांनी सर्वाधिक व्हिस्की रिचवली आहे. भारतात व्हिस्कीची आयात झपाट्यानं वाढलेली असली तरी स्कॉच व्हिस्की कंपनीच्या एकूण आयातीपैकी हा वाटा केवळ २ टक्के इतका आहे. भारत आणि इंग्लंडमधील व्यापारात व्हिस्कीची आयात होणं हा महत्त्वाचा मुद्दा असून येत्या काही काळात व्हिस्कीची आयात आणखी वाढत जाणार असल्याचं स्कॉच व्हिस्की एसोसिएशनने म्हटलं आहे.

कोरोना महामारी संपल्यानंतर स्कॉच व्हिस्कीनं भारतासह जगभरातील अनेक देशांना मोठ्या प्रमाणात व्हिस्कीची निर्यात केली होती. कंपनीनं संपूर्ण जगभरात तब्बल ६.२ अरब पौंड किंमतीच्या व्हिस्कीची निर्यात केलेली आहे. परंतु आता गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी स्कॉच व्हिस्कीच्या निर्यातीत तब्बल ३७ टक्क्यांची वाढ झाली असून त्यात भारताचाही मोठा वाटा असल्याचं संशोधनातून समोर आलं आहे.

IPL_Entry_Point