मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Suicide News : सुनेचा जाच सहन होईना, सासूनं युरिया खाऊन केली आत्महत्या

Suicide News : सुनेचा जाच सहन होईना, सासूनं युरिया खाऊन केली आत्महत्या

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Dec 26, 2022 09:53 AM IST

Nawada Suicide Case : सूनेशी झालेल्या वादानंतर संतापलेल्या सासूनं युरियाचं सेवन करत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Maharashtra Crime News
Maharashtra Crime News (HT_PRINT)

Nawada Bihar Crime News Marathi : सूनेशी झालेल्या वादातून संतापलेल्या सासूनं युरियाचं सेवन करत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून घरात होत असलेल्या वादातून सासूनं धक्कादायक पाऊल उचलत जीवन संपवल्याची घटना बिहारमधील नवादा जिल्ह्यात घडली असून या प्रकरणात आता पोलिसांनी आरोपी सुनेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळं नवादा जिल्ह्यात खळबळ उडाली असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बिहारमधील नवादा जिल्ह्यातल्या घंघोली गावातील एका कुटुंबातील सासू लखिया देवी आणि त्यांची सून पूनम कुमारी यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून कोणत्या ना कोणत्या कारणामुळं सातत्यानं वाद होत होते. अनेकदा घरातील पुरुषांनी आणि नातेवाईकांनी मध्यस्थी करत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला परंतु भांडणं होतच होती. काल संध्याकाळी सासू आणि सुनेचा पुन्हा वाद झाला. त्यानंतर शिवीगाळ झाल्यानंतर सुनेच्या जाचाला कंटाळून सासूनं युरियाचं सेवन केलं, त्यानंतर तिला त्रास व्हायला लागल्यानंतर नातेवाईकांनी नजीकच्या रुग्णालयात दाखल केलं. परंतु उपचारादरम्यान लखिया देवीचा मृत्यू झाला आहे.

नेमका कशामुळं झाला वाद?

लखिया देवीनं सूनेला घरातील काम करण्यास सागितलं होतं, परंतु सून पूनम कुमारीनं त्यासाठी नकार दिल्यामुळं दोघांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर संतापलेल्या सासू लखिया देवीनं टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली. घरात मुलं आणि वृद्ध पती असल्यानं सर्व कामं लखिया देवी यांनाच करावी लागत असल्यानं त्या सूनेवर नाराज होत्या, असं त्यांच्या मुलानं पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. घटनेची माहिती मिळताच नवादा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्रकरणाची चौकशी सुरू केली. त्यानंतर मृत लखिया देवी यांच्या मुलानं दिलेल्या तक्रारीनंतर आरोपी सून पूनम कुमारीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

IPL_Entry_Point

विभाग