मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nagpur Winter Session : आमदार निवास सुनेसुने; अधिवेशनास गेलेले ८० % आमदार हायफाय हॉटेलांमध्ये

Nagpur Winter Session : आमदार निवास सुनेसुने; अधिवेशनास गेलेले ८० % आमदार हायफाय हॉटेलांमध्ये

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Dec 26, 2022 09:56 AM IST

Maharashta Assembly Winter Session : हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरामध्ये येणाऱ्या आमदारांना राज्य सरकारकडून निवासाची सोय करण्यात आलेली आहे. परंतु बहुसंख्य आमदार तारांकित हॉटेलमध्ये मुक्काम करणं पसंत करत आहेत.

Maharashta Assembly Winter Session
Maharashta Assembly Winter Session (HT)

Maharashta Assembly Winter Session : राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरात आलेले बहुसंख्य विधीमंडळाचे सदस्य हे आमदार निवासात न थांबता तारांकित हॉटेलमध्ये मुक्काम करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्यातील ८० टक्के आमदार नागपुरातील तारांकित हॉटेलमध्ये थांबलेले असून त्यांचे कार्यकर्ते आणि स्वीय सहाय्यक हे आमदार निवासात थांबलेले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळं आता ऐन हिवाळी अधिवेशनाच्या काळातच आमदार निवास ओसाड पडल्याचं चित्र निर्माण झालं आहे.

नागपुरात हिवाळी अधिवेशनापूर्वी आमदार निवासाच्या सुशोभिकरणावर कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. परंतु विधीमंडळातील तब्बल ८० टक्के आमदारांनी आमदार निवासामध्ये न थांबता तारांकित हॉटेल किंवा शासकीय विश्रामगृहात मुक्कामाला पसंती दिली आहे. त्यामुळं आमदारांना निवासात थांबायचं नसेल तर अनावश्यक खर्च कशासाठी केला जातोय?, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

हिवाळी अधिवेशनापूर्वी झालं सुशोभिकरण...

राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागानं कोट्यवधी रुपये खर्च करून इमारतीची रंगरंगोटी केली आहे. याशिवाय भोजनगृहात आकर्षक सजावटीसह प्रत्येक खोलीत लाखो रुपयांच्या नवनव्या वस्तू खरेदी करण्यात आल्या आहेत. जुनं फर्निचर हटवून नवं फर्निचर लावण्यात आलं आहे. चादरी आणि सोफेही बदलण्यात आले आहेत. परंतु अशा सुसज्ज इमारतीत आमदार राहतच नसतील तर राज्य सरकारकडून त्यावर कोट्यवधींचा खर्च का करतंय?, असा प्रश्न सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जात आहे.

IPL_Entry_Point