मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Shahid Diwas : “शहीदों की मजारों पर हरबरस लगेंगे मेले, वतन पे मर मिटनेवालों का बाकी यहीं निशां होगा”

Shahid Diwas : “शहीदों की मजारों पर हरबरस लगेंगे मेले, वतन पे मर मिटनेवालों का बाकी यहीं निशां होगा”

Dilip Ramchandra Vaze HT Marathi
Mar 23, 2023 10:37 AM IST

Facts About Shahid Bhagat Singh, Sukhdev & Rajguru : २३ मार्च १९३१ साली शहीद भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरू यांना फाशी देण्यात आली होती. स्वातंत्र्याच्या लढाईत हसत हसत फाशी गेलेल्या या तीन महान क्रांतीकारकांच्या स्मरणार्थ हा दिवस शहीद दिवस म्हणून देशभरात पाळण्यात येतो.

शहीद दिवस
शहीद दिवस (हिंदुस्तान टाइम्स)

आजचा दिवस देश शहीद दिवस म्हणून साजरा करत आहे. शहीदों की मजारों पर हरबरस लगेंगे मेले, वतन पे मर मिटनेवालों का बाकी यहीं निशां होगा असं म्हणत हसत हसत फाशी गेलेल्या शहीद भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरू यांच्या स्मरणार्थ हा दिवस शहीद दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. 

ट्रेंडिंग न्यूज

शहीद दिवसाची पार्श्वभूमी

महान क्रांतीकारक भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरू यांनी इंग्रजांविरोधात स्वातंत्र्याची लढाई सुरू केली होती. त्यांच्या या आंदोलनात मोठ्या प्रमाणात युवक सहभागी होत होते. देशाची सत्ता मुठभर इंग्रजांच्या हातून, मुठभर धनिकांच्या हाती गेली तर त्या स्वातंत्र्याला काही अर्थ उरणार नाही अशा मताचे भगतसिंह होते.

हा देश शेतकऱ्यांच्या हाती असला पाहीजे यासाठी भगतसिंह आग्रही होते. माणसाला मारले जाऊ शकते, त्याच्या विचारांना नाही. मोठमोठी साम्राज्ये पडतात मात्र विचार मरत नाहीत. बहिऱ्या गोऱ्यांपर्यंत आपला आवाज पोहोचवण्यासाठी एक मोठा धमाका गरजेचा आहे. अशा आशयाची पत्रकं शहीद भगतसिंह यांनी सेंट्रल असेंब्लीत बॉम्ब फोडल्यानंतर फेकलेल्या पत्रकात लिहिली होती. ८ एप्रिल १९२९ रोजी  सेंट्रल असेंब्लीत रिकाम्या जागी बॉम्ब फोडल्यावर ही पत्रकं भिरकावत बटुकेश्वर दत्त आणि भगतसिंह यांनी अटक करवून घेतली होती. त्यांच्या अटकेनंतर, ब्रिटीश पोलीस अधिकारी सॅन्डर्सच्या हत्येमध्ये भगतसिंह यांच्या सहभागासाठी त्याच्यावर देशद्रोह आणि खुनाचा खटला चालवला गेला.

लाहोर कॉन्स्पिरसी

भारतीय स्वात्त्र्यलढ्यात या खटल्याला ऐतिहासिक महत्व आहे. लाहोर षडयंत्र म्हणून हा खटला ओळखला जातो. 

शहीद सुखदेव यांच्याबद्दल

शहीद सुखदेव यांचा जन्म १५ मे १९०७ रोजी पंजाबमधील लायलपूर येथे झाला. भगतसिंग आणि सुखदेव यांची कुटुंबे लायलपूरमध्ये एकमेकांच्या जवळ राहत होती. सहाजिकच भगतसिंह यांच्याशी सुखदेव यांची अतूट मैत्री होती. 

हुतात्मा राजगुरू यांच्याबद्दल

हुतात्मा राजगुरू यांचा जन्म २४ ऑगस्ट १९०८ रोजी पुणे जिल्ह्यातील खेडा येथे झाला. राजगुरू लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या विचारांनी प्रभावित होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्यानेही ते प्रभावित होते. पोलिसांच्या मारहाणीत लाला लजपत राय यांचा मृत्यू झाला होता. त्याचा बदला म्हणून १९ डिसेंबर १९२८ साली राजगुरू आणि भगतसिंह यांनी   लाहोरमध्ये ब्रिटीश सहाय्यक पोलिस अधीक्षक सॅन्डर्स यांना गोळ्या घातल्या होत्या.

या तिघांनाही २३ मार्च १९३१ साली फाशी देण्यात आली होती.

IPL_Entry_Point

विभाग