'तुम्ही केवळ अशी प्रकरणे हाताळा...' CJI चंद्रचूड यांचा CBI ला मोलाचा सल्ला
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  'तुम्ही केवळ अशी प्रकरणे हाताळा...' CJI चंद्रचूड यांचा CBI ला मोलाचा सल्ला

'तुम्ही केवळ अशी प्रकरणे हाताळा...' CJI चंद्रचूड यांचा CBI ला मोलाचा सल्ला

Apr 01, 2024 10:35 PM IST

CJI Chandrachud On CBI : सीबीआय तसेच प्रमुख तपास यंत्रणांनी केवळ राष्ट्रीय सुरक्षा आणि देशाविरुद्ध आर्थिक गुन्ह्यांचा समावेश असलेल्या प्रकरणांवर लक्ष केंद्रीत केलं पाहिजे, असा सल्ला सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी दिला आहे.

CJI चंद्रचूड यांचा CBI ला मोलाचा सल्ला
CJI चंद्रचूड यांचा CBI ला मोलाचा सल्ला

CJI Chandrachud Cautions CBI : सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी देशातील सर्वात प्रमुख तपास संस्था सीबीआयला म्हटले की, त्यांनी केवळ अशी प्रकरणे हाताळावीत, जी राष्ट्रीय सुरक्षा आणि देशद्रोहाशी संबंधित असतील. केंद्रीय तपास संस्था (CBI) च्या स्थापना दिवसाच्या निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना जस्टिस चंद्रचूड़ यांनी या गोष्टीवरही प्रकाश टाकला की, टेक्नोलॉजीने गुन्ह्याच्या पद्धतीच बदलल्या आहेत. त्यामुळे तपास संस्थांना मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागतो. 

सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी म्हटले की,  आजच्या जमान्यात CBI ला भ्रष्टाचारविरोधी तपास एजन्सीच्या रुपातील आपली भूमिका बदलून अन्य प्रकारच्या प्रकरणातील तपास करण्यास सांगितले जात आहे. सीबीआयला सल्ला देताना मुख्य न्यायाधीशांनी म्हटले की, मला वाटते की, आपण देशातील या प्रमुख तपास संस्थाचा विस्तार तसा कमीतच केला आहे. या संस्थेला आपले ध्यान अशा प्रकरणांवर केंद्रीत करावे जे राष्ट्रीय सुरक्षा आणि देशाच्या विरोधात आर्थिक गुन्ह्याच्या संबंधित आहे. 

सीबीआय तसेच प्रमुख तपास यंत्रणांनी केवळ राष्ट्रीय सुरक्षा आणि देशाविरुद्ध आर्थिक गुन्ह्यांचा समावेश असलेल्या प्रकरणांवर लक्ष केंद्रीत केलं पाहिजे. राष्ट्राविरुद्धच्या आर्थिक गुन्ह्यांशी संबंधित अशा बाबींवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. प्रत्येक प्रकरण सीबीआयकडे सोपवणे योग्य नाही.

माहिती व तंत्रज्ञानाच्या जमान्यात गुन्ह्यांची पद्धतही बदलली आहे. तंत्रज्ञानाधारित गुन्ह्यांमध्ये झालेली वाढ व त्याच्या बदललेल्या ट्रेंडमुळे आता यंत्रणांसमोर मोठं आव्हान उभं आहे.

Whats_app_banner
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर