मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral Video: ना घोडा, ना गाडी, चक्क जेसीबीवरून निघालं वऱ्हाड; सोशल मीडियावर फोटो व्हायरल

Viral Video: ना घोडा, ना गाडी, चक्क जेसीबीवरून निघालं वऱ्हाड; सोशल मीडियावर फोटो व्हायरल

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Mar 14, 2023 06:52 PM IST

Viral Video: गुजरातमधील नवसारी जिल्ह्यातील एका तरुणाने चक्क जेसीबीवरून त्याच्या लग्नाची मिरवणूक काढली, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहे.

Viral Video
Viral Video

Viral Video: गुजरातमधील नवसारी जिल्ह्यात एक अनोखा विवाह पाहायला मिळाला आहे. नवरदेवला घोडीवर बसून मिरवणूक आणताना अनेकदा आपण पाहतो, पण नवसारीमध्ये आपल्या लग्नात काही हटके करण्यासाठी एका तरुणाने जेसीबीवरून त्याच्या लग्नाची मिरवणूक काढली. या मिरवणुकीचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला नवरदेवाचा व्हिडिओ नवसारी येथील कालियारी गावातील आहे. जिथे आदिवासी धोडिया समाजातील केयुर पटेल यांनी जेसीबीवरून स्वत:च्या लग्नाची मिरवणूक काढली. नवदेवाचे म्हणणे आहे की, त्याला त्याच्या लग्नात काहीतरी वेगळे करण्याची इच्छा होती. त्यामुळेच खोदकामासाठी वापरण्यात येणाऱ्या जेसीबीवरून त्याने स्वत:च्या लग्नाची मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला.

केयूर पटेल यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी त्याने पंजाबमध्ये एका नवरदेवाचा जेसीबीवरून मिरवणूक काढल्याचा व्हिडिओ त्याने पाहिला होता. तोच व्हिडिओ पाहून त्यांनी जेसीबीवर मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला. केयूर म्हणाला की, प्रत्येकजण गाडी घेऊन येतात, तर, काही जण घोड्यावर बसून येतात. पण मला काहीतरी वेगळे करायचे होते, म्हणून मी माझ्या लग्नात जेसीबी आणला.

नवदेवाला जेसीबीमध्ये येताना पाहून नवरीकडची मंडळी आश्चर्यचकीत झाली. एखाद्या वाहनाप्रमाणे जेसीबी पूर्णपणे फुलांनी सजवण्यात आला होता. ढोल वाजवण्याबरोबरच डीजे घेऊन निघालेली ही मिरवणूक वधूच्या घरी पोहोचली. नवदेवाची मिरवणूक पाहून स्थानिकांनाही आश्चर्य वाटले. त्याने व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर अपलोड केला. काही वेळातच हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.

IPL_Entry_Point

विभाग